मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 1 जून 2021 (15:39 IST)

गॅस सिलिंडरच्या किंमतीत मोठी कपात, जाणून घ्या रेट

1 जूनपासून सरकारी तेल कंपन्यांनी एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत  कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. इंडियन ऑयल मार्केटिंग कंपन्यांनी जून महिन्यासाठी देशांतर्गत गॅसचे दर जाहीर केले आहेत. 14.2 किलो विना अनुदानित सिलिंडर (Gas Cylinder Price in Delhi) च्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. मात्र 19 किलो व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीत 123 रुपयांची कपात करण्यात आली आहे. दर महिन्याच्या पहिल्या दिवशी तेल कंपन्या एलपीजी सिलिंडरच्या नवीन किंमती जाहीर करतात.
 
IOC ने 19 किलोग्रॅमच्या कमर्शिअल गॅस सिलेंडरच्या किंमतीत दिलासा दिला आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल केलेला नाही. सलग तिसऱ्या महिन्यात घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. यामध्ये ना कपात झाली आहे ना वाढ झाली आहे. म्हणजेच, घरगुती सिलेंडर्स जुन्या किंमतीवर उपलब्ध असतील. दरम्यान 19 किलोग्रॅमच्या सिलेंडरचे दर याआधी मे महिन्यात कमी करण्यात आले होते.
 
IOC च्या वेबसाइटवरील माहितीनुसार, मुंबईमध्ये 1 जून रोजी 19 किलोग्रॅमच्या कमर्शिअल गॅस सिलेंडरची किंमत 122.5 रुपयांनी कमी केली आहे. यानंतर 19 किलोग्रॅमच्या गॅस सिलेंडरची मुंबईतील किंमत 1422.5 रुपये झाली आहे. मे मध्ये हा दर 1545 रुपये होता. मे मध्ये सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी 19 किलोच्या कमर्शिअल गॅस सिलेंडरची किंमत 45.5 रुपयांनी कमी केली होती.
 
कमर्शिअल LPG गॅस सिलेंडरचे नवे दर
दिल्लीमध्ये 19 किलोग्रॅमच्या गॅस सिलेंडरची नवीन किंमत 1595.50 रुपयांवरून 1473.5 रुपये झाली आहे.
मुंबईमध्ये 19 किलोग्रॅमच्या गॅस सिलेंडरची नवीन किंमत 1545 रुपयांवरून 1422.5 रुपये झाली आहे.
कोलकातामध्ये 1667.50 रुपयांवरून 1544.5 रुपये झाली आहे.
चेन्नईमध्ये 1725.50 रुपयांवरून किंमत कमी होऊन 1603 रुपये झाली आहे.
 
एप्रिल महिन्यात तेल कंपन्यांनी 14.2 किलो एलपीजीच्या किंमतीत 10 रुपयांची कपात केली होती. मेमध्ये त्याच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. दिल्ली, मुंबई, कोलकाता आण चेन्नईमध्ये 14.2 किलोग्रॅमच्या घरगुती गॅस सिलेंडरची किंमत अनुक्रमे 809 रुपये, 809 रुपये, 835.5 रुपये, 825 रुपये आहे.
 
एलपीजी सिलिंडरची किंमत तपासण्यासाठी तुम्हाला सरकारी तेल कंपनीच्या संकेतस्थळावर जावे लागेल. येथील कंपन्या दरमहा नवीन दर जारी करतात. (https://iocl.com/Products/IndaneGas.aspx) या दुव्यावर आपण आपल्या शहरातील गॅस सिलिंडर्सची किंमत तपासू शकता.