मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 31 मे 2021 (18:27 IST)

सोने झाले महाग,किंमत जाणून घ्या

आज सोन्याच्या भावात वाढ झाली असून सोन्याच्या भावात 150 रुपये म्हणजे 0.31 टक्के तेजू होऊन सोन्याचा भाव आज 49,300  रुपये प्रति ग्रॅम झाला.गेल्या सत्रात हा भाव 49,150 रुपये प्रति 10 ग्रॅम होता.आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचा भावात सोमवारी वाढ झाल्याचे दिसून आले. 
 
महाराष्ट्रात सोन्याच्या भावात 110 रुपयांनी वाढ झाली असून राज्यात 24 कॅरेट सोन्याचा भाव 47,700 रुपये झाला असून कालचा भाव 47,590 रुपये प्रति 10 ग्रॅम होता.तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 46,700 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे.काल सोन्याचा भाव 46,590 रुपये प्रति ग्रॅम होता. 
मुबंईत सोन्याचे दर 47,590,पुणे,47,590 रुपये प्रति ग्रॅम आहे.तर चांदीचे दर देखील वधारले आहे.आज चांदीची किंमत 71,600 रुपये प्रति किलो ने झाली आहे.