अजित पवारांना अध्यक्ष कुणी केले?-जितेंद्र आव्हाड
शिवसेनेनंतर राष्ट्रवादीच्या दोन गटांमध्येही आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सातत्याने झडल्या जात आहेत. शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आज अजित पवार गटावर थेट हल्ला चढवत अजित पवारांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष कुणी केले आणि त्यांना पाठिंबा कुणी दिला, याचे काही पुरावे आहेत का, असा थेट सवाल उपस्थित केला.
आव्हाड यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विधिमंडळ पक्ष हा राजकीय पक्ष नाही, विधिमंडळात निवडून येणारे सदस्य हे राजकीय पक्षाचे घटक आहेत, असे सांगताना अजित पवार गट खोटे कसे खरे आहे, हे सांगण्यासाठी पत्रकार परिषदा घेत असल्याचा आरोप केला. अजित पवार गटाने सोमवारी पत्रकार परिषद घेऊन अजित पवार हेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष असल्याचे सांगण्यात आले होते. त्याला आव्हाड यांनी आज उत्तर दिले.
Edited By - Ratnadeep ranshoor