सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 21 ऑगस्ट 2023 (08:47 IST)

मुख्य विचारधारेशी तडजोड नाही : सुनील तटकरे

sunil tatkare
राष्ट्रवादीला शिवसेना सत्तेत चालत असेल तर भाजप सुद्धा चालू शकतो. आत्ताच्या सरकारमध्ये राष्ट्रवादीने सहभाग घेतला तरी पक्षाची मुख्य विचारधारेशी तडजोड केली जाणार नाही. शाहू, फुले, आंबेडकरांची सर्वधर्मसमभावाची आमची विचारधारा असल्याचे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष (अजित पवार गट) खासदार सुनील तटकरे यांनी शनिवारी येथे मांडले.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पुणे शहर कार्यकारिणीतील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना तटकरे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र वाटप करण्यात आले. यावेळी तटकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दिपक मानकर, कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख, महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर, माजी महापौर दत्ता धनकवडे, राजलक्ष्मी भोसले व आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

तटकरे म्हणाले, भिन्न विचारधारेच्या पक्षांसोबत सत्तेत सहभागी झाल्याने सुरूवातीला आमचा विचार पुढे घेऊन जाताना थोडं जड जाईल. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या विकासाला आणि गतिमान महाराष्ट्रासाठी आम्ही महायुतीत सहभागी झालो आहोत. सन २०१९ ला शिवसेनेविरोधात राष्ट्रवादी लढली. त्यानंतर याच शिवसेनेसोबत सत्तेत सहभागी व्हाव लागलं. त्यामुळे आत्ताच्या भाजपसोबत सत्तेत आल्याने काही वेगळं वाटायचे कारण नाही. राष्ट्रवादीची मुळ विचारधारा ही धर्मनिरपेक्षतेची आहे. हीच विचारधारा कायम राहील.

Edited By - Ratnadeep ranshoor