सरकारवर विश्वास ठेवू नका, ते विषकन्या आहे, असं का म्हणाले गडकरी?
सरकारवर प्रत्येक गोष्टींसाठी अवलंबवून राहू नका सत्तेत कोणताही पक्ष असो, त्यापासून दूर राहा. सरकार विषप्रयोग करते आणि सरकारच्या फंदात पडू नका,असं एका जाहीर कार्यक्रमात बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले.उद्योजकांनी उद्योगापासून शासनाला दूर ठेवावे. शासन ही विषकन्या आहे.
असे ते विदर्भ आर्थिक विकास परिषदेने आयोजित केलेल्या अद्भुत विदर्भ परिषदेच्या कार्यक्रमात म्हणाले. आपण सबसिडी घेऊ शकता. पण ती मिळेल की नाही याची शाश्वती नाही.
सध्या लाडकी बहीण योजनेवर पैसा द्यावा लागत आहे. त्यामुळे अनुदानाचे पैसे मिळणार की नाही याची शाश्वती नाही.
सरकार कोणतीही असो. ज्याच्याभरोसावर असली कि त्यालाच उध्वस्त करते. सध्या विदर्भात मोठे गुंतवणूक आणण्यासाठी प्रयत्न सुरु असून कोणीही 500 हजार कोटींची गुंतवणूक करण्याचे इच्छुक नाही. याची खंत वाटत आहे.
गडकरी म्हणाले होते की सरकार एखाद्या 'विष्कन्या'सारखे आहे ज्याची सावली कोणत्याही प्रकल्पाचा नाश करू शकते. सरकारचा हस्तक्षेप, त्याचा सहभाग आणि त्याची सावलीही 'विष्कन्या'सारखी असून कोणताही प्रकल्प उद्ध्वस्त करू शकते, असे ते म्हणाले.
Edited by - Priya Dixit