रविवार, 19 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 5 सप्टेंबर 2025 (17:23 IST)

जेवण बनवणाऱ्या मोलकरणीचे मालकाशी प्रेम संबंध जुडले, पतीला आला संशय आणि मग.... अमरावतीत हे घडले

murder
अमरावतीतून धक्कादायक घटना समोर आली आहे. एका विवाहित महिलेने प्रियकरासह पतीचा निर्घृण खून केला असून महिला व तिच्या प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे. 
अरविंद नजीर सूरत असे या मयत व्यक्तीचे नाव आहे. मयत अरविंद आपल्या पत्नी आणि दोन मुलांसह भाड्याच्या घरात राहत होता.त्याचे प्रेमविवाह होते. त्याची पत्नी एका अविवाहित तरुणाकडे स्वयंपाक बनवायचे काम करायची.तिथे तिचे तरुणाशी प्रेम संबंध बनले. तिच्या वागणुकीत बदल झालेले बघून अरविंदला तिच्यावर संशय येऊ लागला आणि दोन दिवसांपूर्वी तो अरुण तिच्या घरी सिलिंडर घेऊन आल्यावर त्याला या प्रेमप्रकरणाचे समजले आणि या वरून पती पत्नीमध्ये वाद झाले. 
मंगळवारी रात्री पुन्हा दोघांमध्ये जोरदार भांडण झाले आणि रागाच्या भरात येत तिने आपल्या प्रियकराला सांगितले आणि यावरून तिचा प्रियकर घरी आला आणि दोघांनी मिळून त्याला कायमचे रस्त्यातून काढण्याचा विचार केला. पत्नीने अरविंदला झोपेच्या गोळ्या दिल्या जेणेकरून तो बेशुद्ध पडेल. त्यांनतर पत्नीने प्रियकरासह लाकडी कुऱ्हाडीने अरविंदच्या चेहऱ्यावर हल्ला केला. या हल्ल्यात अरविंदचा मृत्यू झाला.
पुढील दिवशी अरविंदच्या भावाने पोलिसांत तक्रार दाखल केली पोलिसांनी तातडीनं तपास सुरु केला आणि मंगळवारी रात्री प्रियकराला अटक केली. तसेच पत्नीला बुधवारी अटक केली. दोघांनी पोलिसांसमोर गुन्हा काबुल केला असून न्यायालयाने दोघांना एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस प्रकरणाचा पुढील तपास करत आहे. 
Edited By - Priya Dixit