संबंधित माहिती
- लाडकी बहीण योजना: या योजनेच्या ई-केवायसी प्रक्रियेसाठी आजची अंतिम मुदत; लाभार्थी महिलांनी अद्याप पडताळणी केलेली नाही, त्यांचे पुढील हप्ते थांबू शकतात
- 'माझी लडकी बहिण योजने'साठी ई-केवायसी करण्याची अंतिम मुदत ३० एप्रिल; फक्त दोन दिवस शिल्लक राहिले
- ई-केवायसी न केल्यास ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ कायमचा बंद
- महाराष्ट्र सरकारने लाडकी बहिण योजनेच्या अपात्र लाभार्थ्यांकडून ११ कोटी रुपये वसूल केले
- लाडक्या बहिणींनो घाई करा! ३० एप्रिलपर्यंत e-KYC अपडेट न केल्यास 'लाडकी बहीण' योजनेचा १५०० रुपयांचा हप्ता रखडणार
लाडक्या बहिणींना 3000 मिळणार की 4500 जाणून घ्या अपडेट
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत लाभार्थी महिलांना लाभ मिळावा आणि योजनेत पारदर्शता येण्यासाठी राज्य सरकार कडून ई-केवायसी अनिवार्य करण्यात आले. तांत्रिक अडचणीमुळे ई-केवायसी करण्यासाठी मुदतवाढ देखील करण्यात आली. आणि 30 एप्रिल पर्यंत शेवटची मुदत देण्यात आली.
आता ही मुदत संपली असून अद्याप लाडक्या बहिणींना मार्च महिन्यांपासूनचे हफ्ते मिळालेले नाही. लाडक्या बहिणी मे महिना आला आहे आणि हफ्त्याची वाट बघत आहे. अखेर पैसे खात्यात कधी जमा होणार आहे हा प्रश्न बहिणींना पडला आहे. या योजनेतील मिळणाऱ्या हफ्त्याबद्दल एक नवीन अपडेट समोर आले आहे.
लाडकी बहीण योजनेत लाभार्थी आणि पात्र महिलांना दर महिन्यांत त्यांच्या खात्यात 1500 रुपये दिले जातात. या योजनेसाठी ई-केवायसी अनिवार्य करण्यात आली असून आता त्याची मुदत देखील संपली आहे. मात्र अद्याप मार्च आणि एप्रिल महिन्यांचे हफ्ते जमा झालेले नाही. आता लाडक्या बहिणींना मार्च, एप्रिल आणि मे महिन्यांचा हफ्ता म्हणजे 4500 रुपये एकत्र देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. किंवा एप्रिल आणि मे चे हफ्ते 3000 रुपये देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
या पूर्वी देखील राज्य सरकार ने लाडक्या बहिणींना दोन महिन्यांचे पैसे एकत्र दिले होते. त्यामुळे दोन महिन्यांचा लाभाचे पैसे एकत्र मिळू शकतात. अद्याप या बाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
Edited By - Priya Dixit
