बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 28 जानेवारी 2022 (09:35 IST)

मास्क मुक्तीचा निर्णय घेणारं महाराष्ट्र पहिलं राज्य ठरणार?

महाराष्ट्र 'मास्कमुक्त' होणार का? असा प्रश्न उपस्थित होण्याचं कारण म्हणजे गुरुवारी  पार पडलेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत याबाबत चर्चा झाली.
 
कोरोना प्रतिबंध लसीकरण मोठ्या संख्येने पूर्ण केलेल्या अनेक देशांमध्ये मास्क घालण्याचे बंधंन काढून टाकण्यात आले आहे. तसंच त्याठिकाणी अनेक निर्बंधही उठवण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही मास्क लावण्याचा नियम शिथिल करण्यात येऊ शकतो अशी चर्चा मंत्रीमंडळाच्या बैठकीत झाल्याचं समजतं.
 
यासंदर्भात कोव्हिड टास्क फोर्सशी चर्चा केल्यानंतरच अंतिम धोरण ठरवलं जाणार आहे.
लसीकरण झालले्या नागरिकांना मास्क घालण्याचे बंधन नाही असा निर्णय घेणारा इस्रायल हा पहिला देश ठरला. परंतु कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर त्यांनीही पुन्हा मास्क लावण्याचा नियम लागू केला.
 
आतापर्यंत मास्क घालण्याची सक्ती उठवलेल्या देशांमध्ये ब्रिटन , अमेरिका, स्वीडन, चीन, न्यूझीलंड, हंगेरी, इटली यांचा समावेश आहे.
 
दरम्यान, भारतात अद्याप केंद्र सरकार किंवा कोणत्याही इतर राज्याने 'मास्कमुक्ती'चा निर्णय घेतलेला नाही.