गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 28 जानेवारी 2022 (08:46 IST)

परमबीर सिंग यांना एसीबीचे समन्स, २ फेब्रुवारीला हजर राहण्याचे आदेश

ACB summons Parambir Singh to appear on February 2 परमबीर सिंग यांना एसीबीचे समन्स
पोलीस निरीक्षक अनुप डांगे यांनी परमबीर सिंग यांची बेहिशोबी मालमत्ता असल्याचे म्हणत त्यांच्यावर भ्रष्ट्राचाराचे आरोप केले. तसेच त्यांचे पब मालकांशी आणि अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचे आरोपही अनुप डांगे यांनी केले होते. यानंतर त्यांनी एसीबीकडे तक्रार दाखल केली. याच प्रकरणी आता परमबीर सिंग यांना एसीबीकडून समन्स बजावण्यात आला आहे. यात त्यांना २ फेब्रुवारी रोजी जबाब नोंदवण्यास हजर राहण्याची सूचना दिली आहे. परमबीर यांना तिसऱ्यांदा हा समन्स बजावण्यात आला आहे. सिंह यांनी यापूर्वी कोरोनाचे कारण देत दोन आठवड्यांचा वेळ मागून घेतला होता. त्यानुसार एसीबीने आता खुली चौकशी सुरू केली आहे, तर सीआयडीकडून ही या प्रकरणाची चौकशी केली जात आहे.
 
गेल्यावर्षी पोलीस निरीक्षक अनुप डांगे यांनी गृहविभागाचे अपर मुख्य सचिव यांनी एक पत्र लिहिले होते. या पत्रात त्यांनी परमबीर सिंग यांचे पब मालकाशी संबंध असल्याचे म्हणत चौकशीची मागणी केली होती. तसेच परमबीर सिंग यांच्याकडे बेहिशोबी मालमत्ता असल्याचे म्हणत भ्रष्टाचाराचे आरोप केले. त्यावेळी व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर वरिष्ठांच्या विरोधात मेसेज पाठवल्याप्रकरणी गावदेवी पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक अनुप डांगे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. यानंतर पोलीस निरीक्षक अनुप डांगे यांची दक्षिण प्रादेशिक परिमंडळ विभागात बदली करण्यात आली.