सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 7 एप्रिल 2022 (12:00 IST)

मुस्लीम बांधवांच्या अंगालाही हात लावू देणार नाही - सुजात आंबेडकर

sujat ambedkar
राज्यातील मुस्लीम बांधवांची जबाबदारी आता आमची आहे. त्यांच्या अंगालाही हात लावू देणार नाही, असं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी केलं आहे.
 
मशिदीवरील भोंगे न उतरवल्यास समोर दुप्पट आवाजात स्पीकर लावा, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं होतं. त्यावर प्रतिक्रिया देताना सुजात आंबेडकर यांनी त्यांच्यावर निशाणा साधला.
 
"अमित ठाकरे यांना हनुमान चालिसा येत नसेल तर इतरांच्या पोरांना हनुमान चालिसा लावा, असं सांगण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला," असा प्रश्न सुजात यांनी राज ठाकरे यांना केला आहे. तसंच तुमचा संपलेला पक्ष हिंदू-मुस्लीम दंगलीवर उभा करू नका, असंही ते म्हणाले.