गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 15 जुलै 2022 (15:00 IST)

'या' निर्णयाचा फेरविचार करणार

eknath shinde
राज्यातील एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारने औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव असे नामांतर करण्याच्या महाविकासआघाडी सरकारच्या निर्णयाचा फेरविचार करण्यात येईल, असे शिंदे सरकारने म्हटले आहे.
 
महाविकास आघाडीचे सरकार असताना उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या शहरांच्या नामांतराच्या निर्णयावर शिंदे-फडणवीस सरकारने आक्षेप घेतला आहे. राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्यास सांगितल्यानंतर सरकारला, असे निर्णय घेता येत नाहीत, अशी भूमिका नव्या सरकाने घेतली आहे. या निर्णयांचा फेरआढावा घेतला जाईल आणि  नामांतराचा निर्णय नव्याने घेणार आहे.