मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 8 जून 2023 (20:56 IST)

30 हजार रुपयांची लाच स्वीकारताना वायरमनला अटक

Bribe
नाशिक :नवीन डीपी बसवून देण्याच्या मोबदल्यात 30 हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने वायरमनला अटक केली आहे. हेमंत विठ्ठल खैरनार ऊर्फ पप्पू असे लाच स्वीकारणार्‍या वायरमनचे नाव आहे. पप्पू खैरनार हा बागलाण तालुक्यातील जोरण विद्युत उपकेंद्रात वरिष्ठ तंत्रज्ञ आहे.
 
तक्रारदार हे शेतकरी असून, त्यांच्या शेताजवळील सार्वजनिक डीपी जळाल्याने शेतातील डाळिंब बागेचे पाण्याशिवाय नुकसान होत आहे. त्यामुळे त्यांनी वायरमन पप्पू खैरनार यांची भेट घेतली. त्याने शेतीसाठी सार्वजनिक इलेक्ट्रिक नवीन डीपी बसून देण्याचे मोबदल्यात 30 हजार रुपये व केबल लावण्याचे मोबदल्यात 2 हजार रुपये अशी एकूण 32 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
 
तडजोडीअंती  30 हजार रुपयांची लाच स्वीकारताना त्याला रंगेहाथ पकडण्यात आले असून, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षिका शर्मिष्ठा वालावलकर, पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक साधना इंगळ व त्यांच्या पथकाने केली.
Edited by : Ratnadeep Ranshoor