सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 10 जानेवारी 2022 (11:32 IST)

मालडोंगरी येथे महिलाचे 2 मुलांसह विहिरीत उडी

चंद्रपूर जिल्ह्यातील ब्र्महपुरी शहराजवळ असलेल्या मालडोंगरी येथील महिलेने घरगुती वादातून स्वत:च्या दोन मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. दीपा रवींद्र पारधी असे मृत महिलेले नाव असून आयुष आणि पियुष अशी मृत बालकांची नावे आहेत. पती रवींद्र याने नातेवाईक, शेजार्यां सह शोधाशोध केली तेव्हा मालडोंगरीकडे जाणार्यां मार्गालगत असलेल्या शेतातील विहिरीत गावकर्यांना त्या तिघांचा मृतदेह तरंगताना दिसून आले. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे, पुढे तपास सुरू आहे.