1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 11 मार्च 2025 (17:39 IST)

रायगड जिल्ह्यात सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह आढळला

रायगड जिल्ह्यातील एका गावाजवळ सुटकेसमध्ये एका अज्ञात महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला असल्याची माहिती पोलिसांनी सोमवारी दिली. अज्ञात व्यक्तीने महिलेची हत्या करून मृतदेह फेकण्याचा संशय पोलीस अधिकाऱ्यांना आहे. 
रायगड जिल्ह्यात पेण तालुक्यातील दुरशेत गावात रहिवाशांना दुपारी रस्त्याच्या कडेला पडलेल्या सुटकेस मधून दुर्गंधी येत असल्याचे समजले त्यांनी पोलिसांना सदर माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सुटकेस उघडल्यावर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
महिलेचे वय 25 ते 35  वर्षाच्या दरम्यान असल्याचा अंदाज आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी मुंबईतील जेजे रुग्णालयात पाठवला आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तींच्या विरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला असून प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. महिलेची ओळख पटवण्यासाठी पोलीस सीसीटीव्ही फुटेज तपासत आहे. 
Edited By - Priya Dixit