मंगळवार, 2 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 9 ऑक्टोबर 2024 (18:09 IST)

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमाला जात असताना एसटी बस दरीत कोसळली, अनेक महिला जखमी

bus accident
रायगड जिल्ह्यात माणगाव तालुक्यात मोर्बा येथे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची वचनपूर्तीच्या सोहळ्यासाठी श्रीवर्धन तालुक्यातील काही  महिलांना घेऊन एसटी महामंडळाची बस निघाली होती. या बसचा अपघात मांजरोणे घाटात म्हसळा येथून माणगाव कडे निघाली असताना 40-50 फूट दरीत कोसळली या अपघातात 8 -9 महिला जखमी झाल्या आहे. जखमींना गोरेगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, माणगाव तालुक्यातील रानवडे येथील महिलांना घेऊन जाणारी बस दुपारी 12:45 च्या सुमारास मांजरोने घाटात बसचे ब्रेक निकामी झाल्यामुळे हा अपघात घडला.

माणगावच्या माणगाव दिघी राष्ट्रीय महामार्गाच्या धनसे मैदानावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा वचनपूर्ती कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने बहिणी हजर राहणार आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हेही सहभागी होण्यासाठी आले होते.
Edited By - Priya Dixit