मंगळवार, 5 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2024 (18:49 IST)

भरधाव वेगवान कार झाडाला धडकली, 4 जणांचा अपघाती मृत्यू

उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यात वेगवान धावणारी बोलेरो अनियंत्रित होऊन झाडावर आदळून अपघात झाला.या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री 12 वाजेच्या सुमारास खरगुपुरच्या -इटियाथोकच्या दिशेने भरधाव वेगाने जाणारी बोलेरो डेंजर झोन मध्ये अनियंत्रित होऊन झाडावर जाऊन आदळली. या वाहनात बसलेले चार तरुण गंभीर जखमी झाले असून बोलेरोचा चक्काचूर झाला.

पोलिसांना अपघाताची माहिती मिळाल्यावर ते घटनास्थळी पोहोचले आणि चोघांना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. हे चौघे तरुण मित्र होते आणि एका मित्राच्या नातेवाईकांकडे शुभ कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जात असताना अपघात घडला.पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी पाठविले आहे. 
Edited by - Priya Dixit