बुधवार, 19 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2024 (09:50 IST)

शिक्षकाच्या कुटुंबातील चार जणांची गोळ्या झाडून हत्या

Uttar Pradesh News
उत्तर प्रदेशातील अमेठी जिल्ह्यात एका शिक्षकाच्या कुटुंबातील चार जणांची हत्या करण्यात आली आहे. भाड्याच्या घरात राहणाऱ्या शिक्षक, त्यांची पत्नी आणि दोन मुलांवर हल्लेखोरांनी गोळीबार केला. ही घटना गुरुवारी सायंकाळी सात वाजता घडली आहे. भवानी शहराच्या मुख्य चौकात असलेल्या भाड्याच्या घरात घुसून शक्षकाच्या कुटुंबावर अज्ञातांनी गोळीबार केला यामध्ये चौघांचा मृत्यू झाला आहे. व त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. घटनेनंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेले. परिसरातील नागरिकारिकांनी घडलेल्या घटनेची माहिती पोलिसांना कळवली.
 
मुख्यमंत्र्यांनी या घटनेची दखल घेतली-
मिळालेल्या माहितीनुसार हे कुटुंब मूळ रायबरेलीचे रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेची दखल घेत या हत्याकांडावर शोक व्यक्त केला आहे. आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याचे आदेश यूपी पोलिसांना देण्यात आले आहे. ही हत्या का करण्यात आली यामागे काय कारण होते याचा शोध पोलीस घेत आहे.