रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 19 सप्टेंबर 2024 (10:31 IST)

कोळशाने भरलेल्या मालगाडीचे डब्बे रुळावरून घसरले

railway track
उत्तर प्रदेशातील मथुरा येथून राजस्थानमधील सुरतगड पॉवर प्लांटला कोळसा घेऊन जाणाऱ्या मालगाडीचे 26डबे वृंदावनजवळ रुळावरून घसरले. एका अधिकारींनी बुधवारी ही माहिती दिली. मथुरा जंक्शन स्टेशनचे संचालक एस.के. श्रीवास्तव यांनी घटनेला दुजोरा दिला.
 
मिळालेल्या माहितीनुसार दिल्लीला जाणाऱ्या मालगाडीचे 26 डबे उत्तर मध्य रेल्वेच्या वृंदावन रोड आणि अजाई स्थानकांदरम्यान रात्री 8.30 च्या सुमारास रुळावरून घसरले. तसेच एनसीआर आग्रा विभागाचे जनसंपर्क अधिकारी, प्रशस्ती श्रीवास्तव यांनी सांगितले की, “गुड्स ट्रेनमधील कर्मचारी सुरक्षित असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.”
 
काही डबे रुळावरून घसरले आहेत तर काही उलटले आहे, असे ते म्हणाले. आग्रा रेल्वे विभागाचे व्यवस्थापक तेज प्रकाश अग्रवाल यांनी सांगितले की, राजस्थानमधील सूरतगड पॉवर प्लांटला जाणाऱ्या मालगाडीचे डबे रात्री ८ वाजता वृंदावन यार्ड ओलांडत असताना रुळावरून घसरले.
 
या घटनेमुळे तीन रेल्वे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. तसेच अग्रवाल म्हणाले की, या घटनेचे कारण अजून समजू शकलेले नाही.  

Edited By- Dhanashri Naik