शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 30 जानेवारी 2022 (16:40 IST)

राज्यात महिला पोलिसांना आता फक्त 8 तास ड्युटी करावी लागणार

महाराष्ट्राचे पोलिस महासंचालक (डीजीपी) संजय पांडे यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, 
राज्यभरातील महिला पोलिस कर्मचाऱ्यांना आता 12 तासां ऐवजी आठ तासांची ड्युटी असेल. महिला कामगारांसाठी कमी केलेला नवीन दिवस प्रायोगिक तत्त्वावर लागू केला जाईल. सर्वसाधारणपणे, पुरुष आणि महिला दोघांचीही 12 तासांची ड्युटी असते.
 
गुरुवारी जारी केलेल्या डीजीपीच्या निर्देशात पुढील आदेश येईपर्यंत महिलांसाठी आठ तासांची ड्युटी कायम राहणार असल्याचे म्हटले आहे. आदेशाची अंमलबजावणी होत असल्याची खात्री युनिट कमांडर्सनी करावी, असेही त्यात म्हटले आहे.
 
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, महिला अधिकाऱ्यांना चांगले काम-जीवन संतुलन होण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. यापूर्वी ही प्रणाली नागपूर शहर, अमरावती शहर आणि पुणे ग्रामीणमध्ये लागू होती, असे अधिकाऱ्याने सांगितले.
 
आपत्कालीन परिस्थितीत किंवा सणासुदीच्या काळात महिला कर्मचाऱ्यांच्या ड्युटी अवर्समध्ये वाढ करता येईल. त्यासाठी संबंधित जिल्हा पोलीस अधीक्षक किंवा पोलीस उपायुक्तांची परवानगी आवश्यक असेल.