शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 30 जानेवारी 2022 (11:03 IST)

ऑनलाईन मिटिंग सुरु असताना नगरसेवकाने सिगारेट ओढली व्हिडीओ व्हायरल

सध्या कोरोनामुळे सर्वत्र ऑनलाईन सुरु आहे. मग ते ऑफिस चे काम असो, शाळेचा अभ्यास असो, मंत्र्यांच्या महत्वाच्या बैठका असो. नागपुरात अशाच ऑनलाईन मिटिंग मध्ये जे काही घडले ते धक्कादायक आहे. हा सर्वत्र प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचे व्हिडीओ व्हायरल झाले आहे. 
 
झाले असे की, नागपूर महापालिकेची ऑनलाईन बैठक सुरु असताना काँग्रेसचे नगरसेवक रमेश पुणेकर चक्क सिगारेट ओढत होते. ही बैठक काही कंपनी समाधानकारक काम देत नसल्याने त्या कंपन्यांचे कंत्राट रद्द करण्याच्या संदर्भात ठेवली होती. या मिटिंग मध्ये नागपूरचे महापौर, महानगरपालिकेचे आयुक्त आणि इतर नगरसेवक सम्मिलीत होते. या ऑनलाईन बैठकीत काँग्रेसचे नगरसेवक रमेश पुणेकर चक्क सिगारेट ओढत होते.  हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून याचे व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाले आहे. हा व्हिडीओ बघून नागरिक संतप्त झाले आहे. आणि काँग्रेसच्या या नगरसेवकांवर टीका केली जात आहे.