1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 30 जानेवारी 2022 (10:29 IST)

आत्महत्या रोखणारे उपकरण

Suicide prevention devicesआत्महत्या रोखणारे उपकरण  Marathi Regional News In Webdunia Marathi
सध्या आत्महत्या करण्याचे प्रमाण जास्त वाढले आहे. नैराश्यातून आत्महत्या करण्याचे विचार उदभवतात. व्यक्ती आत्महत्या करून स्वतःची सुटका तर करून घेतो मात्र त्याच्या पश्चात त्यांच्या कुटुंबियांचे काय आणि कसे होणार याचा विचार करत नाही. आत्महत्या करणे म्हणजे आयुष्यातून पळवाट काढणे आहे. 

आत्महत्या रोखण्यासाठी देवरुख तालुक्यातील कोंड्ये येथील इयत्ता नववीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने आत्महत्या रोखण्यासाठी एका उपकरणाची निर्मिती केली आहे. दिव्या दीपक लाड असे या विद्यार्थिनीचे नाव आहे. तिने तयार केलेल्या एस.पी.हूक या उपकरणाची राज्यस्तरीय इन्स्पायर मानक अवॉर्ड प्रदर्शनासाठी निवड झाल्याचे सांगितले आहे. जिल्ह्यातून या प्रदर्शनी साठी 750 नामांकनांची नोंद करण्यात आली असून त्यापैकी 77 नामांकनाची निवड झाली आहे. त्यात दिव्याच्या आत्महत्या रोखण्याच्या उपकरणाचे समावेश आहे.  या उपकरणाच्या निर्मितीसाठी निर्मला भिडे जनता विद्यालय आणि इंद्रनील तावडे कनिष्ठ महाविद्यालयातील नववीत शिकणाऱ्या दिव्या ला विज्ञान शिक्षक ज्ञानेश्वर शिंदे, मुख्याध्यापक अरुण कुराडे, आणि सहकारी शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले आहे.तिच्या या उपकरणाचा वापर करण्याची वेळ कोणावर येऊ नये. तरुणांचे वेळीच समोपदेशन करावे असे मत तिने व्यक्त केले आहे.  तिच्या या उपकरणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.