मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 30 जानेवारी 2022 (10:25 IST)

अमृता फडवणीसांचा ट्विटद्वारे महाविकास आघाडी मधील नेत्यांवर हल्लाबोल

महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर निशाणा साधलाय.
 
महाराष्ट्र सरकारनं किराणा मालाच्या दुकानांमध्ये वाईनच्या विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासह इतर काही मुद्द्यांवर अमृता यांनी ट्वीट केलं आहे.
अमृता फडणवीसांनी ट्वीटमध्ये "थोडक्यात उत्तर द्यावे - 50 मार्क्स" असं लिहून त्यापुढं तीन पर्याय दिले आहेत. त्यात "Naughty नामर्द, बिगडे नवाब आणि नन्हें पटोले" असे तीन पर्याय आहेत.
 
"या जमाती एकत्रित कोठे पाहिल्या जाऊ शकतात ?" असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर त्यांनी याद्वारे अप्रत्यक्ष टीका केल्याची चर्चा आहे.

तसंच, "रिकाम्या जागा भरा - 50 मार्क्स, असा प्रश्नही त्यांनी मांडला आहे. त्यात _____शराब नही होती !, हरामखोर का मतलब _____है आणि सुनने में आया है _____नामर्द है!" असे प्रश्नही अमृता फडणवीसांनी विचारले आहेत.
#WakeUp, #Confused अशा हॅशटॅगसह त्यांनी हे ट्वीट केले आहेत.
आता महाविकास आघाडीतल्या नेत्यांकडून यावर काय प्रतिक्रिया येते, हे पाहणं महत्वाचं ठरेल.