मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 30 जानेवारी 2022 (10:42 IST)

गोडसेंची फक्त भूमिका केली, विचारसरणी स्वीकारली नाही - अमोल कोल्हे

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी एका सिनेमात महात्मा गांधींचे मारेकरी नथुराम गोडसे याची भूमिका साकारल्यामुळं मोठा वाद निर्माण झाला होता. मात्र, अमोल कोल्हे यांनी या प्रकरणी आत्मक्लेश करत दिलगिरी व्यक्त केली आहे.
 
आळंदीमध्ये महात्मा गांधी यांच्या रक्षा विसर्जन स्तंभाला अभिवादन करून आणि काही वेळ त्यासमोर बसून डॉ. अमोल कोल्हे यांनी हा आत्मक्लेश केला आहे.

डॉ. कोल्हे यांनी नथुराम गोडसे याची भूमिका केल्यानं अनेकांच्या भावना दुखावल्या होत्या. मात्र, महात्मा गांधींचे विचार शाश्वत आहेत. यावर ठाम विश्वास असल्याचं कोल्हे म्हणाले.

"मी नथुरामची भूमिका केली, पण ती विचारसरणी स्वीकारली असा त्याचा अर्थ नाही. महात्मा गांधी यांच्या खुनाचे कधीही समर्थन केलेले नाही आणि करणारही नाही. मात्र या भूमिकेमुळे ज्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, त्यांच्याप्रती दिलगिरी व्यक्त करतो," असं कोल्हे म्हणाले.
 
दरम्यान, नथुराम गोडसेच्या भूमिकेत असलेल्या अमोल कोल्हेंचा हा चित्रपट रविवारी प्रदर्शित होत आहे.