रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 22 जुलै 2023 (18:11 IST)

Yavatmal Weather Update यवतमाळमध्ये पुरात अडकले 45 जण

heavy rain
Yavatmal Weather Update जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजवला आहे. बुधवारी जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यानंतर गुरुवारी यवतमाळमध्ये विविध ठिकाणी जोरदार पाऊस झाला. शुक्रवारही पावसाचा जोर खूप जास्त होता. जिल्ह्यात सरासरी १९.८ मिमी पावसाची नोंद झाली असून सर्वाधिक ६९.१ मिमी पाऊस उमरखेड तालुक्यात झाला आहे.
 
यात आता यवतमाळ जिल्ह्याच्या विविध भागाला शुक्रवारी रात्री मुसळधार पावसाने झोडपले. जिल्ह्यात ढगफुटीसदृश्य पाऊस कोसळला असून अवघ्या २४ तासात यवतमाळ तालुक्यात २३६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर महागाव तालुक्यात १३१ मिमी पावसाची नोंद झाली असून १६ पैकी १४ तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. 
 
या पावसामुळे पैनगंगा,अरूणावती,अडाण,वाघाडीसह नाल्यांना पूर आल्याने शहरासह अनेक गावात पाणी शिरले.पैनगंगा आणि अरुणावती ह्या नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग असल्याने वाहतुक बंद असून अनेक गावांचा संपर्कही तुटला आहे.