मंगळवार, 11 मार्च 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: जेजुरी (पुणे) , सोमवार, 30 मे 2022 (16:09 IST)

जेजुरीत येळकोट येळकोट...

jejuri
तीर्थक्षेत्र जेजुरीत आज सोमवती अमावस्या यात्रेनिमित्त प्रचंड गर्दी झाली होती. सुमारे तीन लाखांवर भाविकांनी आज कुलदैवत खंडेरायाच्या देवदर्शन घेतले. आज सकाळी 11 वाजता देवाच्या मानकऱ्यांनी इशारात केल्यानंतर देवाचे खांदेकरी, मानकऱ्यांनी सदानंदाचा येळकोट येळकोट येळकोट जयमल्हारच्या जयघोषात उत्सवमूर्तीची पालखी क-हा स्नानासाठी उचलली.
 
यावेळी बंदुकीच्या फैरी झाडून पालखी सोहळ्याला सलामी देण्यात आली. गडकोटातील मुख्य मंदिराला प्रदक्षिणा घालून सोहळ्याने क-हा नदीकडे प्रस्थान ठेवले. सायंकाळी ४ वाजता कर्हा नदीवर उत्सवमूर्तीना स्नान घालण्यात येणार आहे.