रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शुक्रवार, 27 मे 2022 (09:02 IST)

पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना अटक

डीएचएफएल प्रकरणात तीनशे कोटींपेक्षा जास्तची फसवणूक केल्याप्रकरणी पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले  यांना CBI कडून अटक करण्यात आली आहे. गेल्या महिन्यात भोसले आणि मुंबईस्थित बांधकाम व्यावसायिक विनोद गोएंका आणि शाहिद बलवा यांच्यासह आणखी दोन व्यावसायिकांशी संबंधित ठिकाणांवर सीबीआयने छापा टाकला होता. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे.
 
अविनाश भोसलेंविरोधात DHFL प्रकरणात गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्यानंतर त्यांच्यावर CBI कडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये अविनाश भोसले यांच्या पुणे-मुंबई परिसरात CBIने छापेमारी केली होती, त्यानंतर त्यांना अटक केली आहे.
 
यापूर्वी देखील ईडीने फेमा कायद्यांतर्गत अविनाश भोसले यांची चौकशी केली होती. गुरुवरी अविनाश भोसले यांना येस बॅंक आणि डीएचएफएल बॅंक गैरव्यवहार प्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने टक केली. मागील काही दिवसांपासून अविनाश सीबीआय जाधव यांचा शोध घेत होती. सीबीआयने मुंबई आणि पुण्यातील काही ठिकाणी सर्च ऑपरेशन सुद्धा केलं होतं. त्यानंतर अविनाश जाधव आणि त्यांच्या निकटवर्तीयांवर सीबीआयने छापेमारी केली होती. मात्र, आता भोसलेंना अटक करण्यात आली असून त्यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.