सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: बुधवार, 25 मे 2022 (09:26 IST)

तारकर्लीमध्ये बोट बुडून दोघांचा मृत्यू

sea boat
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटकांची बोट बुडून झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे.या अपघातात बाळापूर मतदारसंघाचे आमदार नितीन देशमुख यांचे भाचे आकाश यांचा समावेश आहे.
 
या बोटीवर 20 जण होते. ही बोट स्कूबा डायव्हिंगसाठी पर्यटकांना घेऊन गेली होती. परतीच्या मार्गावर असताना झालेल्या अपघातात बोट बुडाली. या अपघातात दोघेजण जखमीही झाले आहेत. त्यांच्यावर मालवणमध्ये उपचार सुरू आहेत. बोटीमधील सर्व पर्यटक पुणे जिल्ह्यातील आणि मुंबईत राहणारे होते. बोट उलटण्याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.