मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , शुक्रवार, 19 नोव्हेंबर 2021 (18:19 IST)

या 19 जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट

यावर्षी महाराष्ट्रासह (Rain in maharashtra) दक्षिण भारतात पावसाचा जोर कायम आहे. दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्रात पावसाळा संपून उत्तरेकडील थंडीची लाट (Winter) सुरू होते. पण यावर्षीचा हिवाळा मात्र याला अपवाद ठरला आहे. राज्यात अजूनही अनेक ठिकाणी किमान तापमानाचा पारा (Temperature in maharashtra) चढाच आहे. तर अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि अंदमान समुद्र परिसरात निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे अनेक ठिकाणांना पावसानं झोडपून काढलं आहे.

पुढील आणखी काही दिवस राज्यात पावसाची स्थिती कायम राहणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. पुढील चार दिवस राज्यात अनेक ठिकाणी येलो अलर्ट (Yellow alert) जारी करण्यात आला आहे. हवामान खात्यानं आज मुंबईसह, पुणे, ठाणे, पालघर, नंदुरबार, धुळे, नाशिक, अहमदनगर, बीड, लातूर, नांदेड, सोलापूर, उस्मानाबाद, सांगली, सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 19 जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी केला आहे.