1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. young man set himself on fire due to having a bad dream in Nasik

वाईट स्वप्न पडत असल्याने युवकाने स्वतःस जाळून घेतल्याची घटना

नाशिक- वाईट साईट पडणाऱ्या स्वप्नांना कंटाळून एका तरुणाने स्वतःस जाळून घेतल्याची घटना घडली आहे.
 
या प्रकरणी समजलेला तपशील असा की, धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील वालवे येथे मूळ राहणार विशाल विश्वास कडवे हा अंबड औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीत कामास होता. दि. 3 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 9 वाजेच्या सुमारास तो कंपनीतून घरी आल्यावर झोपला होता.
 
तेव्हा त्याला वाईट वाईट स्वप्न येत असल्याने, त्या स्वप्नांना कंटाळून त्याने स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळून घेतले. त्याचे नाशिक येथे पूर्ण व्यवस्था नसल्याने त्याचे वडील विश्वास महिमाजी कडवे यांनी विशाल यास खाजगी वाहनाने दि. 5 ऑक्टोबर 2022 रोजी सायंकाळी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
 
त्याच्यावर उपचार सुरू असताना दि. 7 ऑक्टोबर 2022 रोजी डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले. सदर अकस्मात मृत्यूची घटना नंदुरबार येथून काल अंबड पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आली.
 
Edited by: Ratnadeep Ranshoor
पुढील लेख
नाशिक विमानतळ तब्बल १३ दिवस राहणार बंद