शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , शुक्रवार, 26 ऑगस्ट 2016 (14:52 IST)

ठाण्यात 16 गोविंदा पथकांवर गुन्हे

ठाण्यात नियम तोडणाऱ्या 16 गोविंदा पथकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ठाण्यात मनसेने आयोजित केलेल्या दहीहंडीत जयजवान पथकाने 9 थर लावले. त्यामुळे पोलिसांनी दहीहंडी आयोजक अविनाश जाधव आणि जयजवान पथकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर चेंबूरमध्ये मनसे नेते कर्णबाळा दुनबळे यांच्या दहीहंडीतही नियमांची मोडतोड करण्यात आली. नौपाड्यात 40 फुटांवर नियमभंग हंडी उभारुन मनसेने निषेध केला.