1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. दोन वेगवेगळ्या घटनात तिघांचा बुडून मृत्यू

दोन वेगवेगळ्या घटनात तिघांचा बुडून मृत्यू

सिन्नर येथील मुसळगाव गावातील  गणपती विसर्जनादरम्यान दोघे बुडाल्याची घटना घडली आहे. यावेळी  खळवाडी परिसरातील मिञ मंडळाचे संदिप आण्णा सिरसाट आणि रामा शिवाजी सिरसाट बुडवले आहे. यामध्ये राम यांचा मृतदेह बाहेर काढला आहे. संदिपचा शोध अजून सुरु आहे.घटनास्थळी पोलीस व ग्रामस्थ मदत करत आहेत.
 
तर दुसऱ्या घटनेत आश्रमात जेवणासाठी गेलेल्या विद्यार्थ्याचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना पेगलवाडी येथे घडली आहे. 
 
त्र्यंबकेश्‍वर तालुक्यातील तुपादेवी येथे असलेल्या त्र्यंबकराज अनाथालयातील  दत्तू बाळासाहेब विघे (9, रा.अनाथ बालगृह, तुपादेवी) हा जिल्हा परिषदेच्या त्र्यंबकेश्‍वर येथील शाळेत इयत्ता तिसरीत शिकत होता. दुपारी 1.30 वाजेनंतर जेवणाच्या सुट्टीत हा विद्यार्थी बाहेर पडला होता. पेगलवाडी येथील प्रयागतीर्थ तलावावर दत्तूचा मृतदेह कपडे धुणार्‍या महिलांनी बघितला. त्यांनी जवळील हॉटेलमधील लोकांना सांगितले.त्यला रुग्णालायात दाखल केले मात्र त्याला डॉक्टरांनी  मृत घोषित केले आहे.त्र्यंबकेश्वर पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे.
पुढील लेख
राज्यस्तरीय शेळीपालन चर्चासत्राचे आयोजन