पाऊस उघडीपीनंतर रस्तंची दुरुस्ती
मुंबई- राज्यात सध्या सुरू असलेल्या पावसाने उघडीप देताच 86 हजार किमी रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले जाईल. विशेषत: कोकणात गणरायांचे आगमन खड्डय़ातून होणार नाही, असे आश्वासन सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधानसभेत दिले. मुसळधार पावसामुळे सिंधुदुर्गमध्ये जागोजागी खड्डे पडून रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. निदान गणेशोत्सवाआधी तरी कोकणातील रस्त्यावरील खड्डे बुजवावेत, अशी मागणी त्यांनी केली. यावर उत्तर देताना पाटील बोलत होते.

