शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , गुरूवार, 28 जुलै 2016 (10:45 IST)

हेल्मेटसक्तीविरोधात पेट्रोल, डिझेल खरेदी बंद!

पेट्रोल आणि डिझेल खरेदी 1 ऑगस्टपासून बंद करण्याचा निर्णय फेडरेशन ऑफ पेट्रोल डिलर्स असोसिएशनने घेतला आहे. सरकारच्या हेल्मेटसक्तीच्या धोरणाविरोधात असोसिएशनने हा निर्णय घेतला आहे पंप चालकांना ग्राहकांचा होणारा विरोध लक्षात घेता, हा वाद टाळण्यासाठी पेट्रोल, डिझेल खरेदीच बंद करुन विरोध दर्शवण्याचं असोसिएशनने ठरवलं आहे.

हेल्मेटसक्तीच्या कायद्याला आमचा विरोध नाही. मात्र, कायद्याची अंमलबजावणीदरम्यान होणाऱ्या अडचणींना विरोध असल्याचे सांगण्यात आले आहे.

सरकारचा हेल्मेटसक्तीचा निर्णय जनतेच्या हिताचाच आहे. मात्र, अंमलबजावणी दरम्यान आम्हाला त्रास सहन करावा लागतो, असे असोसिएशनचे अध्यक्ष उदय लोध यांनी सांगितले.