गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 14 जानेवारी 2022 (21:41 IST)

‘ज्या पक्षाचे निर्णय त्या पक्षाने घ्यावे’,नाना पटोलेंचा राऊतांना टोला

संजय राऊतांनी आपले गैरसमज काढावे. ज्या पक्षाचे निर्णय त्या पक्षाने घ्यावे, दुसऱ्या पक्षाचे दुसऱ्या पक्षाचे निर्णय दुसरा पक्ष घेणे हा गैरसमज त्यांनी काढावा.” असा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संजय राऊतांना लगावला आहे. नाना पटोले यांनी आगामी गोवा निवडणूकीसंदर्भात बोलत असताना टीका केली.
येत्या १४ फेब्रुवारीला होणाऱ्या गोवा निवडणूकीविषयी बोलताना त्यांनी राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांना नाव न घेता टीका केली होती. गोवा विकास आघाडी बाबत हायकमांड निर्णय घेईल. राष्ट्रवादीचा निर्णय वेगळा असेल व आमच्या पक्षाचा निर्णय वेगळा असेल, असे विधान करत मलिक यांनी संजय राऊतांवर टीका केली होती.