बुधवार, 4 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. रिलेशनशिप
Written By
Last Modified: सोमवार, 5 ऑगस्ट 2024 (17:56 IST)

शिव-पार्वती यांच्या जीवनातून 5 गोष्टी शिकाव्यात, वैवाहिक जीवन नेहमी सुखी राहील

सौभाग्य आणि सुखी कुटुंब यासाठी लोक महादेव आणि देवी पार्वतीची पूजा करतात. तसेच वैवाहिक जीवनात नेहमी सुख टिकून राहावे यासाठी त्यांच्याकडून काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. जर त्यांच्याकडून या गोष्टी अमलात आत्मसात केल्या तर जीवनात न केवळ आनंद राहील शिवाय  ते एकमेकांचे खरे जीवनसाथी म्हणून नेहमी सुखी राहतील. तर चला जाणून घ्या शिव आणि पार्वतीच्या त्या गुणांबद्दल जे आदर्श वैवाहिक जीवनाचे सूत्र आहेत.
 
संयम
पार्वतीजींना भगवान शिव असेच मिळाले नाहीत तर त्यांनी भगवान शिवाला पती म्हणून मिळवण्यासाठी कठोर तपश्चर्या केली होती. पार्वतीजींना माहित होते की त्यांचे ध्येय साध्य करणे अजिबात सोपे नाही. पण त्या धीर धरून राहिल्या. भोलेनाथांची पूजा करून त्यांना प्रसन्न करण्याचा मार्ग जितका सहज आणि सोपा आहे, तितकाच अवघड देखील, असे म्हणता येईल. वैवाहिक जीवनातही संयमाचा उपयोग होतो. हा संयम सर्वात मोठ्या आव्हानांवरही मात करण्यास आणि ध्येय साध्य करण्यात मदत करतो.
 
सोपे जीवन जगा
पार्वतीजी राजकन्येप्रमाणे जगल्या पण भोळ्या भंडारीसाठी कैलास पर्वतावर राहण्यास तयार झाल्या. शिवजींनीही या वैवाहिक नात्यात कोणतेही ढोंग दाखवले नाही, उलट ते नेहमी माता पार्वतीच्या सोबत जसे होते तसेच राहिले. जेव्हा आपण आपले जीवन इतरांसाठी जगतो तेव्हा आपण दाखवतो, जेव्हा आपण स्वतःसाठी जगतो तेव्हा आपण आरामदायक असतो. पती-पत्नीचे जीवन कोणत्याही देखाव्याशिवाय जगण्याची सवय लावा. तुमच्याकडे जे आहे ते सर्वोत्तम आहे, ही भावना मनात ठेवा. प्रेमविवाह असो की अरेंज्ड, तुमची उत्स्फूर्तता हीच गुणवत्ता आहे जी आयुष्यभर नाते टिकवून ठेवण्यास मदत करते. खोटेपणा, दिखावा, फसवणूक यासारख्या गोष्टींपासून तुम्ही जितके दूर राहाल, तितके तुमच्या नात्यासाठी चांगले होईल. एकमेकांसोबत ही सहजता ठेवा.
 
अर्धनारीश्वर
भगवान शिवाचे एक नाव अर्धनारीश्वर आहे. अर्धनारीश्वर म्हणजे अर्धा पुरुष आणि अर्धी स्त्री. भगवान शिवानेही एकदा अर्धनारीश्वराचे रूप घेतले होते. माता पार्वती त्यांच्या अर्ध्या रूपात उपस्थित होती. सुखी वैवाहिक जीवनाचा मूळ मंत्र हा आहे की पती-पत्नीचे शरीर जरी भिन्न असले तरी ते एकच आहेत. त्यामुळे पती-पत्नी समान हक्क आणि सन्मानास पात्र आहेत.
 
प्रेम आत्मा
माता पार्वती आणि भगवान शिव यांच्यातील नाते प्रेमाची खरी व्याख्या दर्शवते. माता पार्वती एक सुंदर आणि कोमल राजकुमारी होत्या पण त्यांनी भोलेनाथला पती म्हणून निवडले. भोलेनाथ हे अस्थिकलश घातलेला आणि गळ्यात नागाची माळ धारण करणारे एक वैरागी होते. माता पार्वतीने भोलेनाथचे स्वरूप पाहिले नाही तर त्यांचा स्वभाव आणि अंतर्मन पाहिले. भोलेनाथ हे नावासारखे निर्मळ आणि निष्पाप आहेत. माता पार्वतीने पैसा किंवा पतीच्या देखाव्याला महत्त्व दिले नाही तर कौटुंबिक जीवनावर प्रेम केले.
 
जबाबदारी
कौटुंबिक जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडल्याने जीवन आनंदी होते. भोले बाबा जेव्हा तपश्चर्येत मग्न राहतात, तेव्हा त्यांच्या अनुपस्थितीत माता पार्वती त्यांचे कुटुंब, पुत्र आणि सर्व देवी-देवतांसह सृष्टीची काळजी घेतात. आदर्श आनंदी जीवनासाठी प्रत्येक पती-पत्नीने एकमेकांच्या उपस्थितीत किंवा एकमेकांच्या अनुपस्थितीत कुटुंबाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या पाहिजेत.