नवीन लग्नानन्तर आनंदी वैवाहिक जीवनासाठी हे नियम अवलंबवा  
					
										
                                       
                  
				  				   
				   
                  				  लग्नासाठी भावी वर आणि वधूला मानसिक दृष्टया मजबूत होणे गरजेचे आहे. लग्न जन्मोजन्माचे बंधन आहे. लग्नानन्तर मुला आणि मुलीच्या आयुष्यात बदल होतात. लव्ह मॅरेज असेल तर एकमेकांना जाणून घ्यायला काहीच वेळ लागत नाही. मात्र अरेंज मॅरेज असल्यास दोघांना एकमेकांना जाणून घेण्यासाठी वेळ लागतो. नवीन लग्न झाल्यावर नात्याला घट्ट करण्यासाठी आणि आनंदी वैवाहिक जीवनासाठी काही नियमांना अवलंबवून वैवाहिक जीवन आनंदी करू शकता. चला तर या नियमांबद्दल जाणून घेऊ या. 
				  													
						
																							
									  				  				  
	एकमेकांसाठी वेळ काढा 
	लग्नानंतर बेरच लोक आपल्या व्यस्त दिनचर्येमुळे जोडीदारासाठी वेळ काढत नाही. कामाच्या व्यापामुळे असे घडते. एकमेकांसाठी वेळ काढा एकमेकांसोबत वेळ घालवा.हे नात्याला घट्ट करण्यासाठी आवश्यक आहे. 
				  											 
						
	 
							
							 
							
 
							
						
						 
																	
									  
	तुम्ही एकत्र या काही  क्रियाकलाप करू शकता, जसे की रात्रीचे जेवण करणे, आठवड्याच्या शेवटी सहलीला जाणे किंवा घरी चित्रपट पाहणे. तुम्ही संध्याकाळी फिरायला जाण्यासाठी आणि दिवसभराच्या गोष्टींबद्दल एकमेकांशी बोलण्यासाठी थोडा वेळ काढू शकता
				  																								
											
									  
	 
	जोडीदाराचे कौतुक करा 
	जोडीदाराचे कौतुक केल्याने त्यांना केवळ खासच वाटत नाही तर पती-पत्नीचे नाते देखील घट्ट होते. जोडीदाराचे कौतुक केल्याने आत्मविश्वास वाढतो. जवळीक वाढते. नात्यात प्रेम वाढते. एकमेकांचे कौतुक केल्याने नाते अधिक घट्ट होतात.
				  																	
									  				  																	
									  
	एकमेकांसमोर मत मांडा
	नात्यात कधीकधी वेळीच मत न मांडल्याने मतभेद होतात आणि हळूहळू नात्यात कटुता येऊ लागते. एकमेकांसमोर मते मांडल्यावर किंवा जोडीदाराच्या भावना समजून घेतल्यावर नात्यात विश्वास वाढतो. वादाची स्थिती निर्माण झाल्यावर घाई घाईने काहीही बोलण्यापूर्वी संयमाने आणि शांततेने समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा. मनातील विचार एकमेकांसमोर मोकळेपणाने शेअर करा.  
				  																	
									  				  																	
									  
	एकमेकांना आदर द्या 
	नाते कोणतेही असो प्रत्येक नात्यात आदर खूप महत्त्वाचा आहे. वैवाहिक जीवनात एकमेकांना आदर दिल्याने आत्मविश्वास वाढतो आणि एकमेकांसाठी आकर्षण वाढते. 
				  																	
									  
	एकमेकांच्या विचारांचा नेहमी आदर करा. एकमेकांची भावना समजून घ्या हे तुमच्यातील नात्यांना घट्ट करते. वैवाहिक जीवन आनंदी बनवण्यासाठी एकमेकांना आदर द्या. जेणे करून तुमचे नाते अधिकच घट्ट होईल. 
				  																	
									  
	 
	 Edited By - Priya Dixit