बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. रिलेशनशिप
Written By
Last Modified: मंगळवार, 7 जानेवारी 2025 (13:41 IST)

Gen-Beta Baby Girl Name: जानेवारी 2025 मध्ये जन्म घेणार्‍या मुलींसाठी यूनिक नाव

Gen Beta baby girl name
वेगवेगळ्या युगांमध्ये जन्मलेल्या मुलांची एका विशिष्ट पिढीमध्ये विभागणी केली जाते. 1997 ते 2012 दरम्यान जन्मलेल्या मुलांना Gen Z किंवा Generation Z म्हणतात. मागील पिढीला मिलेनिअल्स म्हणजेच Gen Y आणि नंतरच्या पिढीला 2012 ते 2024 या काळात Zen Alpha (जनरेशन अल्फा) असे म्हणतात. त्याचबरोबर 2025 सालापासून मुलांची नवीन पिढी अस्तित्वात येत आहे. 1 जानेवारी 2025 पासून जन्माला येणाऱ्या मुलांना Gen Beta असे संबोधण्यात येईल.
 
Gen Beta जनरेशनमध्ये 2025 ते 2039 दरम्यान जन्मलेल्या मुलांचा समावेश असेल. या मुलांचा AI युगाच्या पहिल्या पिढीत समावेश आहे. Gen Beta हे ग्रीक वर्णमालेतील Beta (β) या अक्षरावरून आले आहे. Gen Beta ची वैशिष्ट्ये त्यांना Gen Z पेक्षा वेगळी बनवतात. Gen Beta मुले तंत्रज्ञानासाठी अनुकूल असतील आणि एआय, ऑटोमेशन आणि नवीन तंत्रज्ञानामध्ये वाढतील. पर्यावरणीय शाश्वतता, डिजिटल कनेक्टिव्हिटी आणि जागतिक विचार हे त्यांचे वैशिष्ट्य असेल. हे लोक शिक्षण आणि कामात डिजिटल माध्यमांचा अधिक वापर करू शकतील.
 
आता या पिढीत जन्मलेली मुलं युनिक आहेत, त्यामुळे त्यांचे नावही स्पेशल असायला हवे. वर्षाच्या पहिल्या महिन्यात म्हणजेच जानेवारीमध्ये जन्मलेल्या जनरल बीटाच्या मुलींसाठी खास नावांची यादी दिली जात आहे.
 
काश्वी - तेजस्वी
 
आर्ना - देवी लक्ष्मी
 
अनन्या - अद्वितीय
 
अनिका - सुंदर
 
आध्या - प्रथम शक्ती/ देवी दुर्गा
 
अमोली - मौल्यवान
 
आराध्या - पूजनीय
 
सान्वी - सुंदर/ दिव्य/ ज्ञानी/ शिक्षित
 
मिराया - भगवान कृष्णाची भक्त
 
जिशा - उच्च आत्मा किंवा जीवन जगण्याची आवड असलेली व्यक्ती
 
दित्या - प्रार्थनाचे उत्तर/ लक्ष्मीचे नाव
 
धन्‍या - दिव्‍यता, भाग्‍यवान आणि मौल्यवान
 
मिशिका - ईश्वराचे प्रेम
सांची - प्रिय/ कृपा/ सत्य
 
समायरा - मनमोहक/ आकर्षक
 
कशिश - आकर्षण
 
प्रान्वी - क्षमा/ देवी पार्वतीचे नाव/ ब्रह्मांड ओम ची पहिली ध्वनी
 
कना - सोने
 
काम्या - सुंदर/ यशस्वी
 
काया - देह
कियारा - प्रकाश
 
श्रिया - सौभाग्यशाली/ देवी लक्ष्मीचे नाव
 
वेदिका - ज्ञानाची देवी/ वेदांचे ज्ञान असणारी
 
तान्या - अनमोल/ प्रशंसनीय
 
अन्विता - नेतृत्व करणारी
 
ईशिता - समृद्धी
 
नायरा - मोठे डोळे असणारी / महान व्यक्तिमत्व
 
दृश्या - दर्शनीय
 
मिशिका - देवाची कृपा