शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. रिलेशनशिप
Written By
Last Modified: बुधवार, 3 जानेवारी 2024 (16:29 IST)

Office colleagues disputes ऑफिस वाद मिटवण्यासाठी खास टिप्स

Office colleagues disputes ऑफिस हे कामाचं ठिकाण असलं तरी काही वेळा तुम्हाला इथे चांगले मित्रही मिळतात. तुम्‍हाला करिअरमध्‍ये पुढे जाण्‍यासाठी तुम्‍हाला साथ देणार्‍या लोकांनाही भेटता तर कधी काळी तुम्‍हाला काही त्रासदायक लोकही भेटतात. जर कोणी कामाशी संबंधित गोष्टींबद्दल काही बोलले तर फारशी अडचण होत नाही, परंतु काहीजण जाणूनबुजून तुमच्या कामात आणि जीवनात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे भांडणे होतात.
 
ऑफिसमध्ये वादाचे आणखी एक कारण म्हणजे मतभिन्नता असू शकते. वय, अनुभव आणि ज्ञान यासारख्या अनेक गोष्टी सहकाऱ्यांशी मतभेदाचे कारण बनू शकतात. परंतु ते जितक्या लवकर सोडवले जातील तितके चांगले अन्यथा कधीकधी या समस्येमुळे कामात अडथळे येतात. त्यामुळे ऑफिसमध्ये अशा परिस्थिीला कसे सामोरे जावे ? जाणून घ्या काही खास टिप्स-
 
तक्रार करू नका
सहकाऱ्याशी वाद झाल्यास परिस्थिती स्वतः हाताळा. प्रत्येक गोष्टीबद्दल बॉसकडे तक्रार करू नका. कामाबाबत काही मतभेद असतील तर एकत्र सोडवा. जर हे शक्य नसेल तर वरिष्ठांची मदत घेऊ शकता, परंतु हे दोन्ही सहकाऱ्यांनी एकत्रितपणे ठरवले पाहिजे. तुमच्या जोडीदाराबद्दल खाजगीत तक्रार करणे टाळा. यामुळे तुम्हा दोघांमधील संबंध अधिक गंभीर होतात आणि तो तक्रारही करू लागतो.
 
ऐकण्याची सवय लावा
कोणाच्याही हस्तक्षेपाशिवाय वाद मिटवायचा असेल तर ऐकण्याची सवय लावा. याचा अर्थ असा आहे की समस्या कुठे आणि का झाली आहे हे तुम्ही समोरच्या व्यक्तीची बाजू देखील ऐकली पाहिजे. दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप सुरू झाल्यानंतर लोक स्वतःला बरोबर सिद्ध करण्याचा प्रयत्न करू लागतात. त्यासाठी समोरच्यावर कितीही चिखलफेक करावी लागली तरी चालते मात्र अशाने तुमची इमेज आणि नाते नक्कीच बिघडू शकते.
 
उपायांवर चर्चा करा
तुम्हाला तुमच्या सहकार्‍यांशी भांडण वाढवायचे नसेल, तर तुमचा अहंकार बाजूला ठेवून थोडा वेळ शांतपणे बसा आणि उपायांवर चर्चा करा. अहंकाराने, कोणतीही समस्या कधीच सुटत नसून वाढतेच.
 
नैतिकता राखा
सहकाऱ्याशी मतभेद असले तरी व्यावसायिक दृष्टिकोन ठेवा. गरज असेल तेव्हा सहकार्‍याला मदत करण्यास टाळाटाळ करू नका. तुमच्या रागात नैतिकता विसरू नका. रागाच्या भरात चुकीचे शब्द किंवा वैयक्तिक कमेंट करणे टाळावे.
 
प्रकरण हाताबाहेर जात असल्यास संबंधित मॅनेजरशी संपर्क साधा
कार्यालयात कोणत्याही मुद्द्यावर सुरू झालेला वादविवाद नियंत्रणाबाहेर जात असेल, तर हा मुद्दा आपापसात न ठेवता एचआर किंवा तुमच्या मॅनेजरशी चर्चा करणे योग्य ठरेल. यामुळे समस्या वाढण्याची शक्यता कमी होते आणि एचआर किंवा इतरांच्या सहभागानंतर विवाद ताबडतोब सोडवला जातो.