मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी या गोष्टी लक्षात ठेवा
Parenting tips: मुलांच्या सर्वांगीण विकासात पालकांची भूमिका प्रमुख आणि महत्त्वाची असते. मुलांची शारीरिक, मानसिक, भावनिक आणि सामाजिक विकासासाठी मुलांची योग्य काळजी घेण आवश्यक आहे. मुलांच्या विकासाची सुरुवात आईच्या गर्भातून होते. आईने सकस आहार नियमित तपासणी आणि निरोगी जीवनशैलीचा अवलंब केल्यास बाळाची चांगली वाढ होते. आईने गरोदर अस्ताना सकारात्मक विचार ठेवावे तसेच तणाव मुक्त राहावे. जेणे करून बाळाचा चांगला विकास होतो.
जन्मानान्तर बाळाच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी जन्मापासून ते 2 वर्षांचा काळ महत्त्वाचा आहे. त्याची काळजी घेणे आवश्यक आहे. बाळाला जन्मांतर कमीतकमी 6 महिन्यांपर्यंत आईचे दूध द्यावे. 6 महिन्यांनंतर, पोषक तत्वांनी युक्त अन्न देणे सुरू करा. वेळोवेळी डॉक्टरांकडून तपासणी करून घ्या.लसीकरण वेळीच करा.
मुलाचे मोटर कौशल्ये वयाच्या 3 ते 5 वर्षांत विकसित होतात. या काळात तो धावणे, उडी मरने, रंग भरणे, चित्र काढ़ने शिकतात. या काळात त्याच्याशी बोला त्याला गोष्ठी सांगा, पुस्तके वाचा अस केल्याने त्याचे भाषेचे आकलन वाढेल.त्याला आहारात हिरवा पालेभाज्या, फळे, दूध आणि प्रथिनेयुक्त आहार द्या.त्याला स्वावलम्बी होण्यासाठी हात धुवायला आणि स्वताचे बूट घालायला शिकवा.
वयाच्या 6 ते 12 वर्ष मुले शाळेत जाऊ लागतात. त्यांची शारीरिक क्रिया वाढते. त्यांना खेळ, योग आणि इतर शारीरिक क्रियाकलापांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करा. मुलाच्या सामाजिक विकासासाठी हे आदर्श वय आहे. त्यांना मित्र बनवणे, टीमवर्क करणे आणि इतरांसोबत राहणे शिकवा.
वयाच्या 13 ते 18 व्या वर्षी मुलांमध्ये निरोगी जीवनशैली, खाण्याच्या योग्य सवयी, नियमित व्यायामाची सवय लावा. त्यांच्यावर लक्ष ठेवा, या वयात मुले वाइट सवयी लवकर शिकतात.त्यांचाशी त्यांच्या भविष्याबद्दल करिअर बद्दल संभाषण करा.
अस्वीकरण: आरोग्य, सौंदर्य काळजी, आयुर्वेद, योग, धर्म, ज्योतिष, वास्तू, इतिहास, पुराण इत्यादी विषयांवर वेबदुनियावर प्रकाशित/प्रसारण केलेले व्हिडिओ, लेख आणि बातम्या केवळ जनहित लक्षात घेऊन तुमच्या माहितीसाठी आहेत. वेबदुनिया याच्या सत्यतेची पुष्टी करत नाही. कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला जरूर घ्या.
Edited By - Priya Dixit