1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. रिलेशनशिप
  4. Marriage Anniversary Wishes For Sister And Jiju In Marathi

Marriage Anniversary Wishes For Sister And Jiju In Marathi लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा ताई आणि दाजी

Marriage Anniversary Wishes For Sister And Daji In Marathi
तुम्हा दोघांची जोडी नेहमी अशीच सदाबहार राहो
तुमच्या संसारात प्रेमाचा सुगंध दरवळत राहो
ताई आणि जिजू, 
तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
 
एकमेकांच्या सोबतीने तुम्ही आयुष्याची अनेक आव्हाने पेलली आहेत, 
आता येणारा काळ फक्त सुख आणि समाधानाचा असो
ताई, तुला आणि जिजूला 
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा!
 
सात जन्माच्या गाठी आज पुन्हा एकदा रेशमी झाल्या, 
लग्नाच्या वाढदिवसाच्या तुम्हाला लाख लाख शुभेच्छा
 
जगातील सर्वात सुंदर आणि समजूतदार जोडीला 
लग्नाच्या वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा
तुमचे एकमेकांवरील प्रेम दिवसेंदिवस वाढत जावो, 
हीच ईश्वरचरणी प्रार्थना
 
तुमच्या जोडीला कुणाची नजर न लागो, 
तुमचे आयुष्य सुख-समृद्धीने सदैव बहरून जावो.
 
प्रत्येक जन्मी तुम्हा दोघांचीच जोडी जमू दे, 
तुमच्या संसारात आनंदाची बाग फुलू दे
आजचा दिवस तुमच्या आयुष्यात नवा उत्साह घेऊन येवो
हार्दिक शुभेच्छा!
 
सात सप्तपदींनी बांधलेलं हे प्रेमाचं बंधन, 
जन्मभर राहो असंच कायम
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
 
परमेश्वर तुम्हा दोघांना सुख, समृद्धी आणि दीर्घायुष्य देवो
तुमच्या जीवनात आनंदाचे क्षण वारंवार येत राहोत
हॅप्पी मॅरेज अ‍ॅनिव्हर्सरी ताई आणि जिजू!
 
तुमचे प्रेम दरवर्षी अधिक बहरत राहो, 
हीच ईश्वरचरणी प्रार्थना
हैप्पी ॲनिव्हर्सरी दीदी आणि जीजू!
 
तुमच्या जोडीकडे बघितले की 
'मेड फॉर इच अदर' या शब्दाचा खरा अर्थ समजतो
तुम्हा दोघांचे हसणे कधीच कमी न होवो
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
 
विश्वासाचे नाते असेच घट्ट असावे, 
संकटातही एकमेकांचा हात हातात असावा
तुम्हा दोघांच्या प्रेमाचा हा प्रवास असाच अखंड चालू राहो
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
 
माझ्या लाडक्या बहिणीला आणि जीजूंना लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! 
तुमचा संसार नेहमी सुखाचा राहो.
 
लग्नाचा वाढदिवस म्हणजे केवळ तारखेचा उत्सव नाही
तर दोन जीवांनी एकत्र पाहिलेल्या स्वप्नांचा उत्सव आहे
तुमच्या स्वप्नांना नवी क्षितिजे मिळोत
खूप खूप शुभेच्छा!
 
प्रेम आणि विश्वास असाच कायम राहो
सुखी जोडप्याला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
 
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 
तुमच्या प्रेमाची ही गाठ अशीच घट्ट राहो!
 
साखर आणि दुधाप्रमाणे तुम्हा दोघांचे नाते 
एकमेकांत मिसळून गोड झाले आहे
हे गोडपण आयुष्यभर टिकून राहो
प्रिय ताई आणि जिजू, 
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!
 
एकमेकांच्या साथीने प्रत्येक दिवस सुंदर जावो! 
Happy Anniversary!
 
अभिनंदन! 
हे जोडपे नेहमी आनंदी राहो
 
जसे फुलाशिवाय बागेला शोभा नसते, 
तसे तुमच्याशिवाय आमच्या घराला शोभा नसते
तुम्हा दोघांची साथ अशीच कायम राहू दे. 
अ‍ॅनिव्हर्सरीच्या शुभेच्छा!
About Writer
वेबदुनिया फीचर टीम
वेबदुनिया फीचर टीम ही केवळ तांत्रिक गोष्टींवर काम न करता, चालू घडामोडींच्या पलीकडे जाऊन जीवनशैली, आरोग्य, मनोरंजन, तंत्रज्ञान, साहित्य, आणि मानवी कथा अशा विविध श्रेणींमध्ये सखोल आणि रंजक माहिती देणारे विशेष लेख तयार करते. वाचकांना केवळ बातम्याच नाही, तर त्यांच्या आवडीच्या विषयांवर दर्जेदार आणि विश्लेषणात्मक वाचन साहित्य उपलब्ध करून देणे.... आणखी वाचा
पुढील लेख
उन्हाळ्यात या प्रकारे फळं खाल्ली तर उलट आजार होऊ शकतो? सत्य जाणून घ्या