Relationship Tips: सुनेचं सासू सासऱ्यांशी पटत नाही,या टिप्स अवलंबवा
लग्नानंतर मुलगी आपले घर आणि कुटुंब सोडून पतीसह संपूर्ण कुटुंबाला आपलेसे करते. पण अनेक वेळा त्या मुलीला सासरी पटत नाही तिला परकेपणा वाटू लागतो. मग तिला ही गोष्ट सहन होत नाही. सासरच्या घरात तिला ओळख मिळत नाही, तेव्हा ती कोणाचीही पर्वा न करता मोठ्यांनाही उत्तरे देऊ लागते.सासू सासऱ्यांशी तिचे पटत नाही. त्यांच्यामधील मतभेद वाढू लागतात. अशा परिस्थिती नवरा बायको आणि आई वडिलांच्या मध्ये फार चिरडतो. कधी कधी मुलींच्या आई वडिलांच्या हस्तक्षेप केल्याने देखील सासरच्या मंडळींशी मतभेद होतात. पत्नीचे सासू-सासऱ्यांशी पटत नसेल तर या टिप्स अवलंबवा जेणे करून त्यांचे संबंध सुधारतील.
सासू सासऱ्यांशी गैर समज करणे -
सासू सासऱ्यांशी झालेले गैरसमज दूर करा त्यामागील कारणे जाणून घ्या . असं केल्याने गैरसमज दूर होऊन त्यांच्यातील नाते संबंध सुधारतील.पत्नीला देखील मोकळेपणाने बोलण्याची संधी द्या
पत्नी आणि पालकांना समान आदर द्या-
अनेकदा सुनेला वाटते की नवरा आपल्याशी चांगला वागत नाही आणि आई वडिलांचा पक्ष घेतो . आणि आई वडिलांना असं वाटत की मुलगा बायकोचा पक्ष घेतो. अशा परिस्थितीत नवऱ्याने जबाबदारीने पत्नी आणि आईवडिलांना सामान आदर आणि महत्त्व दिले पाहिजे .
पालकांची बाजू घेणे-
लग्नानंतर स्त्रीला सासरच्या घरात फक्त पतीचा आधार असतो. जर पत्नीने तुमच्याशी एखादी गोष्ट शेअर केली आणि तुम्ही नेहमी आई-वडिलांची बाजू घेत असाल तर तिच्या मनात तुमच्याबद्दल आणि कुटुंबाबद्दल चुकीच्या भावना येऊ लागतात. प्रत्येक गोष्टीत पत्नीची बाजू घेऊ नये. तुम्हाला दोन्ही बाजूंनी समान रुपेने उभे राहावे लागेल. त्यामुळे दोन्ही पक्षमधील संघर्ष कमी होईल.
कौटुंबिक वेळ
पत्नी आणि पालकांमध्ये चांगले संबंध निर्माण करण्यासाठी तुम्ही सर्वजण एकत्र फिरायला जाऊ शकता. आनंदाचे क्षण एकत्र घालवल्याने नात्यांमध्ये आलेला दुरावाही दूर होईल. तसेच, पत्नी आणि पालक एकमेकांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेतील.
पत्नीच्या पालकांना आदर द्या -
लग्नानंतर, पुरुष आपल्या पत्नीला सर्वांचे ऐकण्याचा आणि कुटुंबातील सर्व सदस्यांचा आदर करण्याचा आदेश देतो. पण अनेक वेळा माणूस सासरच्या माणसांच्या मानाला महत्त्व द्यायला विसरतो. परिणामी बायको देखील तुमच्या आई-वडिलांशी तशाच वागायला लागतात. म्हणूनच दोन्ही पक्षांना समान आदर दिला पाहिजे.
Edited By - Priya Dixit