रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. रिलेशनशिप
Written By

Saas Bahu Relationship सासूने आपल्या सुनेशी नाते कसे टिकवायचे ?

Saas Bahu Relationship आपल्याला सुनेच्या जीवनकथेत खलनायिकाऐवजी नायिकाची भूमिका साकारणी सासू बनायचं असेल, तर हा लेख तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतो. सर्वप्रथम आपल्या सुनेबद्दल कोणत्याही प्रकारचे गृहितक करणे टाळा. हे खरे आहे की प्रत्येक घराच्या स्वतःच्या प्रथा असतात. आणि जर आपण त्या शिकवले नाही तर तिला हे सांगणार तरी कोण? काही गोष्टींची काळजी घेऊन आपलं नातं ही गोड होऊ शकतो-
 
तिची आई व्हा
सून फोनवर आईशी गोड आणि प्रेमाने बोलत असल्याचे पाहून सासूला अनेकदा वाईट वाटते. सासूला वाटतं की ती आपल्याशी असं कधीच बोलत नाही. असे का घडते याचा कधी विचार केला आहे का? नसेल तर आत्ताच विचार करा. सुनेचे आपल्या मुलांसारखे लाड करा. कधी तिची आवडती डिश तयार करा, तर कधी तिला तणावात बघून काय समस्या आहे जाणून घेण्याचा प्रयतन करा. सुनेला कधी ताप, सर्दी किंवा मासिक पाळीचा त्रास असेल तर तिला आराम करायला सांगा आणि तिची काळजी घ्या. तिला घरकामात काही कारणामुळे उशिर होत असल्यास मदत करा. जेव्हा आपण आईसारखे वागाल तेव्हा आपल्याला सुनेला आपल्याबद्दल आदर आणि प्रेम वाटेल आणि ती पण आपली मनापासून काळजी घेईल. लक्षात ठेवा की ती आपल्या मुलांच्या वयाची आहे, आपल्या नाही.
 
काही कठोर बोलण्यापूर्वी विचार करा
बरं आमच्या घरात असंच होतं. किती तरी सुनांना हा डायलॉग ऐकायला मिळतो. आपल्याला माहित आहे की असे वाक्य उच्चारल्यावर मुलगी बाहेरची वाटते. आपणही असे टोमणे मारत असाल तर थांबवा. आपल्या टोमण्यांमुळे सुनेला गुदमरल्यासारखे वाटते. त्यावेळी तिला एकटं वाटतं. तिला तिच्या आईची आणि तिच्या प्रेमाची आठवण येते आणि तिला तिच्या आईवडिलांच्या घरी जाण्याची इच्छा असते. अशात ती आपल्यासोबत असली तरी ती मनाने सोबत राहू शकत नाही. अशा गोष्टी सतत होत राहिल्या तर हळूहळू ती आपल्यापासून एक प्रकारची दुरवस्था निर्माण करते. आणि मग ती जेव्हा वारंवार तिच्या आई-वडिलांच्या घरी जाण्याचा हट्ट करते तेव्हा आपल्याला वाईट वाटते ? 
 
तिला आपलेपणाची जाणीव करवून द्या
प्रत्येक मुलगी तिच्या स्वप्नात सासरच्या घराची कल्पना करते. तिला तिची खोली तिच्या पद्धतीने सजवायची आहे. तिला किचन किंवा लिव्हिंग रूममध्ये तिच्या आवडीच्या नवीन गोष्टीही घालायच्या आहेत. असे केल्याने तिलाही त्या नवीन घरात आपलेपणा जाणवतो. पण अनेकदा असे दिसून येते की जेव्हा सून काही बदलण्याचा प्रयत्न करते तेव्हा सासू तिच्यावर रागावते आणि सर्व जुन्या गोष्टी फेकून द्या किंवा बदलायच्या असतील तर आम्हाला बाहेर काढून टाका, असेही टोमणे मारते. या गोष्टींच्या भीतीने सून काहीही बदलायला घाबरते आणि मग तिला घरात परकेपणा जाणवतो. आता हे घरही तिचे देखील आहे हे समजून घेतलं पाहिजे, त्यामुळे त्याच्या इच्छेनुसार ते घर सजवण्याचा अधिकारही त्याला आहे. जेव्हा ती स्वतः घर सजवेल तेव्हा तिला ते आवडेल. तसेच जेव्हा आपण तिच्या भावनांची काळजी घेता तेव्हा ती जुन्या गोष्टी फेकून देणार नाही, तर ज्या गोष्टींशी तुमच्या भावना जोडल्या आहेत त्या गोष्टींची काळजी घेईल.
 
मुलगी आणि सून असा भेद करू नका
जेव्हा तुम्हाला तुमच्या सुनेची एखादी गोष्ट आवडत नाही, तेव्हा तिला वाईट बोलण्यापूर्वी किंवा मनात तिचा तिरस्कार करण्याआधी दोन मिनिटे थांबा आणि विचार करा की माझ्या मुलीने हे केले असते तर मलाही असेच वाटले असते का? लक्षात ठेवा सून सुद्धा कोणाची तरी मुलगी आहे आणि आपली मुलगी सुद्धा एक दिवस सासरी जाणार आहे किंवा सासरी गेली आहे. जर आपल्या मुलीशी चांगली वागणूक मिळावी असे वाटत असेल तर सर्वप्रथम स्वतःला बदलावे लागेल. आपण विचार करा, जर आपण आपल्या मुलीला मॉडर्न कपडे घालण्यापासून रोखत नाही, उशिरा उठल्याबद्दल तिची खरडपट्टी काढत नाही, तर सुनेशी असं का वागता? जर आपण पुन्हा पुन्हा तिला अशीच अडवणूक करत राहिलो, तर ती आपल्याशी जुळवू शकेल का, याचे आकलन तुम्हीच केले पाहिजे.
 
सुनेला घरची मोलकरीण प्रमाणे वागवू नका
समजा आपले वय झाले आहे आणि विश्रांतीची देखील गरज आहे, परंतु याचा अर्थ असा नाही की सुनेवर घरातील सर्व कामांचा भार टाकून द्यावा. सगळा भार तिच्यावर टाकून, आपण दिवसभर आराम करून किंवा टीव्ही पाहण्यात घालवता असे असेल किंवा आपल्याला काम करणे जमत नसेल तर तिला मदतीसाठी मोलकरणीची व्यवस्था करा. सुनेला कामाला लावून निवृत्त होऊ नका. नाहीतर सुनेलाही असं वाटतं की मला या घरात फक्त काम करायला आणलं आहे. अशा स्थितीत अनेक मुली अनेकदा तणावाखाली राहतात आणि मी या घरची मोलकरीण आहे का, या प्रश्नाचे उत्तर देणे भाग पडते.