1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. रशिया - युक्रेन संघर्ष
Written By
Last Modified: शनिवार, 18 मे 2024 (08:28 IST)

Russia Ukraine Crisis:पुतिन म्हणाले – खार्किव ताब्यात घेण्याची योजना नाही

bladimir putin
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन म्हणाले की, युक्रेनच्या खार्किव भागात हा हल्ला केवळ बफर झोन तयार करण्याच्या उद्देशाने होता. हा परिसर काबीज करण्याचा त्यांचा कोणताही विचार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी शुक्रवारी चीनमधील हार्बिन येथे माध्यमांशी संवाद साधला. 
 
पुतिन म्हणाले, "मी जाहीरपणे सांगितले की हे असेच चालू राहिल्यास, आम्हाला सुरक्षा क्षेत्र तयार करण्यास भाग पाडले जाईल." रशियन सैन्य योजनेनुसार पुढे जात असल्याची माहिती त्यांनी दिली. पुतिन म्हणाले की, रशियाची सध्या खार्किव ताब्यात घेण्याची कोणतीही योजना नाही. 
 
युक्रेनमधील परिस्थिती इतकी गंभीर आहे की राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्कीला त्यांचा स्पेनचा दौरा रद्द करावा लागला. राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी एका हॉस्पिटलला भेट दिली, त्यादरम्यान त्यांच्यासोबत मीडियाही होता. त्यांनी रुग्णालयात जखमी जवानांची भेट घेतली. झेलेन्स्की म्हणाले, “माझ्यासाठी येथे असणे अधिक महत्त्वाचे आहे. प्रत्येक वॉर्डात जाऊन त्यांनी सैनिकांची भेट घेतली. त्यांनी सैनिकांना पदक देऊन त्यांचा गौरव केला. 

झेलेन्स्की म्हणाले, "परिस्थिती अतिशय गंभीर आहे. खार्किव गमावणे आम्हाला परवडणारे नाही." जखमींजवळ उभे राहून ते म्हणाले की, अमेरिकेने मदत देण्यास केलेल्या विलंबाचा थेट परिणाम युद्धावर होत आहे. शेकडो लोक मरण पावले. अनेक जण जखमीही झाले आहेत, त्यामुळे त्यांचे येथेच थांबणे अधिक महत्त्वाचे आहे. 

Edited by - Priya Dixit