शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. रशिया - युक्रेन संघर्ष
Written By
Last Modified: शनिवार, 17 डिसेंबर 2022 (09:30 IST)

Russia-Ukraine War: युक्रेनवर वेगवान क्षेपणास्त्राने हल्ला, पुतिन जाणार बेलारूसला

रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाला नऊ महिन्यांहून अधिक काळ लोटला तरी पुतिन यांचे सैन्य आपले हल्ले कमी करत नाहीये. ताज्या वृत्तानुसार, रशियन सैन्याने पुन्हा एकदा युक्रेनच्या तीन प्रमुख शहरांवर वेगवान क्षेपणास्त्र हल्ले केले आहेत. राजधानी कीवच्या महापौरांनी शहरातील मध्यवर्ती जिल्ह्यांमध्ये स्फोट झाल्याची माहिती दिली. कीवचे महापौर विटाली क्लिट्स्को यांनी सांगितले की, डेस्न्यान जिल्ह्यात स्फोट ऐकू आले आणि त्यांनी रहिवाशांना आश्रय घेण्याचा इशारा दिला. दरम्यान, रशियन हल्ल्यानंतर मुख्य शहरात वीज नसल्याचे पूर्व खार्किव प्रदेशाचे गव्हर्नर म्हणाले.
 
रशियाने बुधवारी युक्रेनमधील अधिकृत पॅट्रियट क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली नष्ट करण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती दिली आहे. रशियन लष्कराच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ख्रिसमसच्या काळातही हल्ले थांबणार नाहीत. त्याच वेळी, आंतरराष्ट्रीय मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमेरिका या आठवड्याच्या शेवटी युक्रेनला पॅट्रियट मिसाइल सिस्टम देईल. तो पाठवण्याच्या योजनांना अंतिम रूप देत आहे. 
 
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन सोमवारी बेलारूसला भेट देतील आणि त्यांचे समकक्ष आणि सहयोगी अलेक्झांडर लुकाशेन्को यांच्याशी चर्चा करतील. बेलारूस प्रेसीडेंसीने शुक्रवारी सांगितले की ही बैठक मिन्स्क येथील इंडिपेंडन्स पॅलेस, लुकाशेन्को यांच्या कार्यालयात होईल.
 
 
Edited By - Priya Dixit