गुरूवार, 25 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. रशिया - युक्रेन संघर्ष
Written By
Last Modified: शुक्रवार, 3 जून 2022 (17:11 IST)

Russia Ukraine War : रशियाने दोन लाख युक्रेन मुलांचे केले अपहरण,युक्रेनचे राष्ट्रांध्यक्षाचा दावा

Russia Ukraine war; Russia abducts 200
युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी एक खळबळजनक दावा केला की रशियाने 200,000 युक्रेनियन मुलांचे अपहरण केले आहे. या गुन्हेगारी कटाचा उद्देश केवळ लोकांचे अपहरण करणे नाही तर त्यांना युक्रेनला पूर्णपणे विसरण्यास भाग पाडणे आणि त्यांना परत येण्यास असमर्थ बनवणे हा आहे.
 
"युक्रेन या गुन्ह्यासाठी जबाबदार असलेल्यांना शिक्षा करेल, परंतु प्रथम ते रशियाला युक्रेन जिंकणे अशक्य असल्याचे युद्धभूमीवर दर्शवेल," झेलेन्स्की म्हणाले. युक्रेनचे लोक शरणागती पत्करणार नाहीत आणि युक्रेनच्या मुलांना दुसऱ्याची (रशिया) मालमत्ता बनू देणार नाहीत. झेलेन्स्की म्हणाले की, रशियन हल्ल्यांमुळे 243 मुले मारली गेली आहेत आणि 446 जखमी झाले आहेत.
 
याशिवाय, लक्झेंबर्गच्या संसदेत आभासी भाषणादरम्यान, झेलेन्स्की म्हणाले की रशियाने आतापर्यंत युक्रेनच्या 20 टक्के जमिनीवर कब्जा केला आहे. गव्हाच्या पुरवठ्याबाबत झेलेन्स्की म्हणाले, युक्रेनचे सर्व सागरी मार्ग आणि बंदरे रशियाच्या ताब्यात आहेत.
 
लुहान्स्कचे स्वायरोडोन्स्क शहर रशियन हल्ल्यांच्या केंद्रस्थानी आहे. शहराच्या प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, रशियन सैन्याने शहराच्या 70 टक्क्यांहून अधिक भागावर कब्जा केला आहे आणि हजारो लोक वीज आणि अन्नाशिवाय घरांमध्ये अडकले आहेत.