रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. रशिया - युक्रेन संघर्ष
Written By
Last Modified: बुधवार, 20 नोव्हेंबर 2024 (15:36 IST)

Russia-Ukraine War: अमेरिकेने कीव मधील दूतावास बंद केला, हवाई हल्ल्याची भीती

रशिया -युक्रेन युद्ध सुरूच आहे. युद्धाच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने कीवमधील दूतावास बंद करण्याचे आदेश दिले आहे. तसेच दूतावासातील अधिकाऱ्यांना सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. वास्तविक, कीवमधील त्यांच्या दूतावासावर हवाई हल्ला होऊ शकतो, अशी भीती अमेरिकेला वाटत आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी करून ही माहिती दिली आहे. 
 
रशिया युक्रेन युद्धाच्या वाढत्या तणावांमधून अमेरिकेने हे पाऊल घेतले आहे. अमेरिकेने युक्रेनला रशियावर लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्याची परवानगी दिल्यामुळे परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे. 
 यानंतर रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी सुधारित आण्विक धोरणावरही स्वाक्षरी केली, ज्याअंतर्गत रशियाने युक्रेन युद्धात लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांसह केलेला हल्ला हा तिसऱ्या देशाचा सहभाग मानला जाईल आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून रशिया देखील अण्वस्त्र हल्ला करू शकतो. 

सध्या परिस्थिती तणावपूर्ण आहे. नार्वे, स्वीडन आणि फिनलँड या तीन यूरोपीय देशांमध्ये घबराहट पसरली आहे. या तिन्ही देशांच्या सरकारांनी आपल्या नागरिकांना सर्व जीवनावश्यक वस्तूंचा साठा ठेवण्याचा सल्ला दिला आहे. सैनिकांना युद्धासाठी तयार राहण्यास सांगितले आहे. स्वीडनने तर अणुयुद्ध झाल्यास किरणोत्सर्गापासून संरक्षण करण्यासाठी आयोडीनच्या गोळ्या विकत घ्याव्यात आणि ठेवाव्यात असे निर्देश दिले आहेत.
Edited By - Priya Dixit