1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. सचिन तेंडुलकर
  4. Sachin Tendulkar played aviation cricket video

सचिन तेंडुलकर मुलगी सारा आणि सून सानिया सोबत विमानात क्रिकेट खेळला, व्हिडिओ व्हायरल

सचिन तेंडुलकरने नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो आपली मुलगी सारा तेंडुलकर आणि सून सानिया चंडोकसोबत विमानात क्रिकेट खेळताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
'मास्टर ब्लास्टर' सचिनने सोशल मीडियावर एक मजेशीर व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो आपली मुलगी सारा तेंडुलकर आणि सून सानिया चंडोकसोबत विमानात क्रिकेट खेळताना दिसत आहे. व्हिडिओ शेअर करताना सचिनने लिहिले, "उंची काहीही असो, दृष्टिकोन बदलता कामा नये." व्हिडिओमध्ये सचिन फलंदाजी करत आहे, तर सारा क्षेत्ररक्षण करत आहे आणि सानिया गोलंदाजी करत आहे.  बॅट उलटी धरून सचिन म्हणतो, "तुम्ही मला कधीही बाद करू शकणार नाही. मी बॅट तिरकी करून खेळलो तरच तुम्हाला थोडीफार संधी आहे." मात्र, सारा आणि सानियाने हार मानली नाही. त्यांचा पहिला प्रयत्न अयशस्वी ठरला असला तरी, साराने दुसऱ्यांदा झेल घेतला आणि आपल्या वडिलांना बाद केले. चाहत्यांना हा मजेशीर क्षण खूप आवडत असून ते सतत कमेंट्स करत आहे.
Edited By- Dhanashri Naik
About Writer
वेबदुनिया न्यूज टीम
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा