1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. सचिन तेंडुलकर

कपिलचे आव्हान पूर्ण केले: सचिन

'माझ्या पाकिस्तानचा पहिल्या दौर्‍यात महान अष्टपैलू क्रिकेटपटू कपिल देवने मला दहा वर्षे क्रिकेट खेळण्याचे आव्हान दिले होते. ते मी कधीच पूर्ण केले आहे. गेली 20 वर्षे मी क्रिकेट खेळत आहे,' असे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने सांगितले.

मुंबईत एका कार्यक्रमात क्रिकेट किटचे सचिनच्या हस्ते अनावरण करण्यात आले. त्यावेळी तो बोलत होता. तो म्हणाला की, भारतासाठी खेळणे हे माझे स्वप्न होते. हे स्वप्न 1989 साली पूर्ण झाले. माझ्या जीवनातील पहिल्या क्रिकेट दौर्‍यात मी पाकिस्तानमध्ये खेळायला गेलो होतो. त्यावेळी कपिल मला म्हणाला जर तू दहा वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलास तर तू काहीतरी मिळवले, असे समज. कपिलचे ते आव्हान मी स्वीकारले होते आणि गेल्या दहा वर्षांपूर्वीच ते पूर्ण केले. जवळपास वीस वर्ष मी खेळतोय. दोन दशक आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणे हा खूप चांगला अनुभव आहे. इतकी प्रदीर्घ कारकीर्द इंग्लंडचा माजी कर्णधार ग्रॅहम गूचची होती. त्याने 1975 ते 1995 दरम्यान दोन दशके क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला होता.