गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. सचिन तेंडुलकर
Written By भाषा|

सचिन 22 विक्रमांचा बादशाह

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गेल्या दोन दशकांपासून आपल्या फलंदाजीने मोहिनी घालणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर दोन, चार नव्हे तर 22 विक्रमांचा बादशाह आहे. त्याचा नावावर 22 विश्वविक्रमाची नोंद आहे. त्यात सर्वाधिक शतके आणि सर्वाधिक धावा करण्याचाही समावेश आहे.

सचिनने नुकत्याच श्रीलंकेत झालेल्या तिरंगी मालिकेत 44 वे शतक केले. त्यानंतर त्याचा नावावर किती विक्रम आहे, हा प्रश्न विचारला जावू लागला. त्यानंतर त्याच्या नावावर 22 विश्वविक्रमांची नोंद आढळून आली.
कसोटीत सर्वाधिक धावा 12473
कसोटीत सर्वाधिक शतके 42
कसोटीत सर्वाधिक अर्धशतके 95
सर्वाधिक चौकार 1676
एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक धावा 16895
सर्वाधिक शतके 44
सर्वाधिक अर्धशतके 91
यासह एकूण 22 विक्रम मास्टर ब्लास्टरच्या नावावर आहेत.