testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

या 5 चुकांमुळे सेक्स लाइफ होऊ शकते बरबाद

love making
अनेकदा पार्टनर्स आपल्या सेक्स लाइफबद्दल बोलण्यात लाजतात आणि त्यामुळे मजा बिघडतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संवाद. आणि या व्यतिरिक्त काय कारणं आहेत ज्यामुळे सेक्स लाइफ बरबाद होऊ शकते जाणून घ्या:

पुढाकार न घेणे/लाज वाटणे
आपण लाजाळू किंवा संकोची असाल आणि इच्छा असली तरी पुढाकार घेत नाही अशात योग्य वेळ टळते. इच्छा असल्यावर पुढाकार घेऊन पार्टनरला त्यासाठी तयार केल्याने त्यानंतर मिळणार मजा औरच असेल. संबंध सुरू करताना किंवा त्या दरम्यान आपल्याला काय हवं, आपली आवड काय हे सांगण्यात लाज वाटत असल्यास आपल्या मर्जी कधीच पूर्ण होऊ शकणार नाही. आपली आवड आणि कल्पना पार्टनरसोबत शेअर केल्याशिवाय मजा येणार तरी कसा.
रिलॅक्स नसणे
उत्तम सेक्स लाइफसाठी रिलॅक्सेशन आवश्यक आहे. कोणतेही काम घाई घाईत किंवा करायचे म्हणून केल्याने मजा येत नसतो. बेडवर गेल्यावर लगेच झोपण्यापेक्षा एकमेकांसाठी क्वालिटी टाइम काढणे अधिक योग्य ठरेल. स्पॉन्टेनियस राहावे. दररोज सेक्स एक काम म्हणून खानापुरती करण्यापेक्षा आठवड्यातून एकदा किंवा दोनदा काही नवीन पद्धती केल्याने त्याचा भरपूर मजा घेता येऊ शकतो.
वाद किंवा ताण
ताण किंवा कोणत्याही गोष्टीमुळे घडलेला वाद सेक्स लाइफवर प्रभाव टाकतो. आपला मूड नसल्यास मजा येणे शक्यच नाही. म्हणून समजदारीने यातून बाहेर पडून फ्री आणि फ्रेश माइंडने संबंध स्थापित करावे.

अव्यवस्था असणे
बेडवर घाण चादर, बेडरूममध्ये पसारा, शुद्ध वार्‍याची कमी, विचित्र रंगाचा नाइट लँप, अशा वातावरणात मूड बनण्याऐवजी बिघडू शकतो. आपलं बेडरूम या प्रकारे ठेवावं की ताण दूर करण्यासाठी बाहेर जाण्याची गरज भासायला नको.
फोरप्ले न करणे
आपलं पूर्ण लक्ष आणि ऊर्जा ऑर्गेज्मवर असलं तरी फोरप्लेला महत्त्व देण्याची गरज आहे. एकमेकांना मसाज, किंवा एकमेकांच्या शरीराशी चाळे करण्याने देखील मूड बनतं आणि नंतरचा मजा दुप्पट होऊ शकतो.


यावर अधिक वाचा :

सेक्स लाईफ सुधारण्यासाठी आहाराचा कितपत उपयोग होतो?

सेक्स लाईफ सुधारण्यासाठी आहाराचा कितपत उपयोग होतो?
जर एखाद्या अन्नपदार्थामुळे सेक्स लाईफ सुधारते, असं सिद्ध झालं तर ते पदार्थ हमखास विकले ...

किस करण्याचे फायदे जाणून घेतल्यावर दररोज घ्याल चुंबन

किस करण्याचे फायदे जाणून घेतल्यावर दररोज घ्याल चुंबन
ओंठावर किस करणे प्रेम दर्शवण्याचा भाव आहे. पण आपल्याला हे माहित आहे का की ओठांवर किस ...

रात्री उशिरा झोपणार्‍या पुरुषांना नपुंसक होण्याचा धोका

रात्री उशिरा झोपणार्‍या पुरुषांना नपुंसक होण्याचा धोका
स्मार्टफोन आल्यापासून रात्री उशीरापर्यंत हातात फोन ठेवणार्‍यांची संख्या वाढत असून अनेक ...

हे प्रश्न विचारा आणि त्याला स्पर्श न करता उत्तेजित करा

हे प्रश्न विचारा आणि त्याला स्पर्श न करता उत्तेजित करा
शारीरिक संबंधात स्पर्शाचं आपलं महत्त्व आहे. हात, खांदे, गळा, ओठ यांना स्पर्श करून ...

तुम्ही डेमिसेक्‍शुअल (demisexual) तर नाही, जाणून घ्या याचे ...

तुम्ही डेमिसेक्‍शुअल (demisexual) तर नाही, जाणून घ्या याचे लक्षण
मागील काही वर्षांमध्ये सेक्‍शुएलिटीबद्दल लोक जास्त खुलून बोलू लागले आहे. आता या ...